Sharad Pawar : मध्यरात्रीच्या नोटीसनंतर रोहित पवारांचं दोन बड्या नेत्यांकडे बोट, शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर!
Sharad Pawar PC : शरद पवार यांना रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शरद पवार यांनी अधिक भाष्य करणं टाळलं.

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मध्यरात्री महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस देत बारामती ॲग्रोचे (Baramati Agro) दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. सूडबुद्धीने कारवाई झाल्याचा आरोप रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. मात्र यावर सविस्तर बोलण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नकार दिला आहे. "मी कारवाईबाबत बोलणार नाही," असं शरद पवार म्हणाले.
कारवाईवर बोलणार नाही : शरद पवार
शरद पवार हे आज बारामतीतील (Baramati) गोविंद बाग (Govind Baug) या निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत आज विविध संस्थांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यात त्यांना रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शरद पवार यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. बारामती अॅग्रो प्लांटवरील कारवाईवर सध्या बोलणार नाही, असं ते म्हणाले.
रोहित पवारांना नोटीस, बारामती अॅग्रोचे दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना
दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आमदार रोहित पवार यांना मध्यरात्री नोटीस देत बारामती ॲग्रोचे दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. यासाठी रोहित पवार यांना मंडळाकडून 72 तासांची मुदत देखील देण्यात आली आहे. या नोटिसीमध्ये संबंधित प्रकल्प बंद करावेत अशा सूचना नमूद करण्यात आले आहेत. स्वत: रोहित पवार यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. तसंच आपल्यावरील कारवाई सूडबुद्धीने केल्याचं म्हटलं. "सरकारविरोधात भूमिका घेत असल्यामुळेच माझ्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. मात्र आम्ही घाबरणार नाही. राज्यातील 2 ज्येष्ठ नेत्यांनी माझ्या वाढदिवसा दिवशी मला जरी गिफ्ट दिल असलं तरी आगामी निवडणुकांच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेच्या माध्यमातून त्यांना रिटर्न गिफ्ट मिळेल, असं त्यांनी म्हटलं.
राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाकडून सत्ताधाऱ्यांवर टीका
रोहित पवार यांच्यावरील कारवाईनंतर राष्ट्रवादीसह विरोधी पक्षानेही सत्ताधाऱ्यांवर टीका करायची संधी सोडली नाही. राजकीय नाकेबंदी करता येत नाही म्हणून सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचं म्हटलं. त्यामुळे या कारवाईबाबत शरद पवार काय बोलणार याची उत्सुकता लागली होती. परंतु आपण सध्या का कारवाईवर उत्तर देणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात या कारवाईबाबत शरद पवार काय बोलणार याची उत्सुकता आहे.
हेही वाचा
BREAKING : रोहित पवारांना रात्री 2 वाजता नोटीस, बारामती अॅग्रो 72 तासात बंद करण्याची सूचना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
