Supriya Sule : अब की बार गोळीबार सरकार; सुप्रिया सुळेंची सरकारवर जोरदार टीका
बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान यांच्या घरा बाहेर आज पहाटे 4:50 वाजता दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे.यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल मत व्यक्त केलं आहे.
पुणे : बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानयांच्या (Salman Khan) घराबाहेर आज पहाटे 4:50 वाजता दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे.यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल मत व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या की ही घटना खूपच धक्कादायक आहे .त्या भागात अनेक ज्येष्ठ नागरिक हे सकाळी मॉर्निंग वॉकला जात असतात. मुल शाळेत जात असतात अनेक लोक रस्त्यावर असतात आणि अस असताना जर भर रस्त्यात गोळीबार होत असेल तर अब की बार गोळीबार सरकार वर शिक्का मोर्तब झाला आहे.काही महिन्यांपूर्वी सत्तेत असलेल्या आमदारांकडून पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केलं जात आहे.याच अर्थ असा की ट्रीपल इंजिन सरकारकडून अशा गोळीबाराला कोणाचं तरी सहकार्य किंवा आशीर्वाद आहेच ना, अशी टीका यावेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली.
डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आहे. यावेळी त्या बोलत होत्या.ज्या भारताच्या सुपुत्राने आपल्याला संविधान दिलं अशा या महामानवाच आशीर्वाद घेण्यासाठी आपण इथं आलो आहे.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधानाच रक्षण आमच्याकडून नेहमी केलं जाणार आहे,असं यावेळी सुळे म्हणाल्या.
सरकारच धोरण बदलत चाललं आहे का?, असं यावेळी सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की भाजपचे खासदारच म्हणाले होते की आम्हाला संविधान बदलायचं आहे. शेवटी पोटातील ओठांवर येतोच. राज्याची काय परिस्थिती चालली आहे हे सगळे बघतच आहे. हे सगळं गृहमंत्री यांचं अपयश असल्याचं यावेळी सुळे म्हणाल्या.
मूळ पावरांच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सुनेत्रा पवार या भावूक झाल्या याबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की शरद पवार यांच्यावर टीका 60 वर्ष सुरू आहे.आणि शरद पवार यांच्यावर टीका केली की हेडलाईन होते हे सर्वांना माहीत आहे. दररोज शरद पवार यांच्या विरोधात कटकारस्थान सुरू आहे.आपण नाणं हे 60 वर्ष खणखणीत सुरू आहे ही चांगली बाब आहे ना?, त्यांना काहीही करून शरद पवार यांना संपवायचं आहे आणि हे त्यांचं कटकारस्थान आहे, असं यावेळी सुळे म्हणाल्या.
दुष्काळाच्या परिस्थितीबाबत सुळे म्हणाल्या की अत्यंत वाईट परिस्थिती ही निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी पिण्याच पाणी हे मिळत नाहीये.पाण्याचं विषय हा खूपच गंभीर झाला आहे.माझ्या समोर बारामती लोकसभा मतदार संघातील अनेक प्रश्न आहे आणि की तिथं व्यस्त आहे.दुष्काळाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार सिरयस नाहीये.एकीकडे दुष्काळ तर दुसरी कडे अवकाळी पाऊस शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे.अस यावेळी सुळे म्हणाल्या.
इतर महत्वाची बातमी-
Pune News : बीजे वैद्यकीय महाविद्यालयात दोन महिला डॉक्टरांवर रॅगिंग; प्रशासनाकडून चौकशी सुरु