Baramati Loksabha election : मतदानादिवशी बारामतीत बारा भानगडी; शरद पवार गटाकडून 28 तक्रारी, पण दोन तक्रारींची दखल
बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाकडे 28 तक्रारी दाखल झाल्या असल्याच कविता द्विवेदी यांनी सांगितले आहे..
बारामती, पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सगळ्या महाराष्ट्रचे लक्ष लागले आहे. काल बारामती लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. पण मतदानपेक्षा चर्चा जास्त झाली ती निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीची. बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 28 तक्रारी निवडणूक आयोगाकडे केल्या त्यातील 19 तक्रारी या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केल्या आहेत.
बारामती म्हटलं की पवार आणि पवार म्हटलं की बारामती याच मतदारसंघात दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.. अजित पवार आणि शरद पवारांची प्रतिष्ठा या मतदारसंघात पणाला लागली आहे. अजित पवारांच्या पक्षाकडून पैसे वाटल्याचा व्हिडीओ रोहित पवारांनी पोस्ट केला. मतदान संपेपर्यंत जवळपास 19 तक्रारी या निवडणूक आयोगाकडे शरद पवारांच्या गटाने केल्या.
पैसे वाटणे, शिविगाळ, EVM मशिनची पूजा, वेल्हे येथील PDCC बँक वेळ संपून देखील उघडी ठेवल्याचे तक्रारीमध्ये उल्लेख आहे..रुपाली चाकणकर यांनी EVM ची पूजा केल्या प्रकरणी तर वेल्हे येथील pdcc बँक वेळ संपून देखील उघडी ठेवल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.19 पैकी 2 तक्रारीची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. राहिलेल्या तक्रारीवर कारवाई करण्याची मगणी करण्यात आली आहे.
बारामती लोकसभा मतदार संघात असे गलिच्छ प्रकार कधी घडले नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे..आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत त्यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.. तर अजित पवारांच्या गटाकडून एकही तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली नसल्याचं अजित पवार गटाचे बारामतीचे प्रचार प्रमुख किरण गुजर यांनी सांगितले.
काल एकमेकांविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने योग्य चौकशी करावी आणि कारवाई करावी, असं अजित पवार म्हणाले आहेत.
आजपर्यंत एकमेकांना मदत करणारे या निवडणुकीत सामोरा समोर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत..आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून समोरच्या गटाने आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तक्रारी दाखल केला..त्यातील दोन प्रकरणावर गुन्हा देखील नोंद झाला. आता आणखी पुढे काय होत हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे .पण पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत कोणते पवार उजवे ठरतात यासाठी चार जूनची वाट पाहावी लागणार आहे.
इतर महत्वाची बातमी-