एक्स्प्लोर

Pune Crime News : बारामतीचं मतदान संपताच वारजेत हवेत गोळीबार; परिसरात भीतीचं वातावरण

बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान संपताच पुण्यातील वारजे परिसरात दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली.  

पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून (Pune Crime News) गोळीबाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भररस्त्यात अनेक ठिकाणी गोळीबाराचे प्रकरणं समोर आले आहेत. त्यातच आता बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान संपताच पुण्यातील वारजे परिसरात दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली.  

आरोपींनी हवेत गोळीबार केला असून, गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही. गोळीबार करणारे आरोपी कात्रजच्या दिशेने पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. हवेत केलेल्या गोळीबाराने काही वेळ परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. लोकांमध्ये खळबळ उडाली होती.  

वारजे माळवाडी येथील रामनगर भागात एक दोन नाही तर तिघे जण दुचाकीवरुन आले आणि त्यांनी हवेत गोळीबार केला.  साधारण रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. काल बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडलं. पुण्यातील वारजे हा परिसरात बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. सगळं मतदान सुरळीत पार पडल्यानंतर ही घटना घडली. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. 

मतदानाचं सगळं वातावरण शांत झाल्यानंतर हा प्रकार घडला. या तिघांनी गाडीवरुन येऊन हवेत गोळीबार का केला?, याचं कारण समजू शकलं नाही. गोळीबार करुन पसार झाल्याने तिघांचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. परिसरातील सगळे सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासलं जात आहे. तिघांचाही शोध घेणं सुरु आहे. तिन्ही आरोपी सापडल्यानंतर त्यांनी हा प्रकार नक्की का केला असावा, याचं कारण स्पष्ट होईल. 

पुण्यात चाललं तरी काय...

पुणे जिल्ह्यात गोळीबार करणं आता नेहमीचं झालं असल्याचे मागील काही दिवसांच्या घटनांवरून समोर येत आहे. शिक्षणाचं माहेर घर म्हणून असलेलं पुणे आता गोळीबारांच्या घटनांवरून चर्चेत येत आहे. मागील मागील आठवड्यातच पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहराजवळ रात्रीच्या सुमारास एका सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे हॉटेलमध्ये घुसून जेवणाला बसलेल्या या तरुणाची हत्या करण्यात आली. यापूर्वी देखील सतत पुण्यात अशा गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. आता तर क्रिकेटच्या वादातून गोळीबार केला जात असल्याचे समोर आले आहे.

इतर महत्वाची बातमी-

Sharad Pawar: शरद पवार इज बॅक, 84 वर्षांचा योद्धा पुन्हा लढाईत उतरणार, पुढच्या तीन दिवसांत दौरे आणि सभांचा धडका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीकाDevendra Fadnavis : धुळे लोकसभेत फक्त मालेगाव मध्यमुळे महायुतीचा उमेदवार गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
Embed widget