एक्स्प्लोर

Baramati Crime News: स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी आरोपीचा गेम; अल्पवयीन असताना केला होता खून आता दोन वर्षांनी झाली हत्या

Baramati Crime News: दोन वर्षांपूर्वी गणेश वाघमोडे याने शशिकांत कारंडे यांचा खून केला होता. त्यानंतर बरोबर दोन वर्षांनीच गणेशचा खून करण्यात आला आहे.

Baramati Crime News: राज्यभरात मागील काही दिवसांमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. अशातच एका अल्पवयीन आरोपीचा खून (Crime News) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतःच्या वाढदिवसाचे सामान घेऊन जाताना बारामती तालुक्यातील जळोचीमध्ये जुन्या भांडणाच्या वादातून टोळक्याने काल(बुधवारी) रात्री गणेश धुळाबापु वाघमोडे (वय १७) या अल्पवयीन गुन्हेगार मुलाचा खून (Crime News) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

खून झालेल्या गणेश वाघमोडे याने शाळेसमोरच शशिकांत कारंडे यांचा खून (Crime News) केला होता. त्यानंतर आता जवळपास दोन वर्षांनी गणेश वाघमोडेची अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार करत खून केल्याची घटना समोर आली आहे. काल(बुधवारी) रात्री बारामती शहरातल्या जळोची येथील काळा ओढा याठिकाणी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दोन वर्षांपूर्वी गणेश वाघमोडे याने शशिकांत कारंडे यांचा खून केला होता. त्यानंतर बरोबर दोन वर्षांनीच गणेशचा खून करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी नवनाथ उत्तम चोरमले (वय ३९), यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहॆ.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश वाघमोडेसह १७ वर्षे वयाच्या तीन अल्पवयीन मुलांनी शशिकांत कारंडे यांचा खून (Crime News) केल्याचे निष्पन्न झाले होते. या तिघांना बारामती शहर पोलिसांनी अटक केली होती. कारंडे यांच्या मुलगा आणि या तिघांमध्ये एका मैत्रिणी वरून वाद झाला होता. या वादानंतर कारंडे यांनी त्या मुलांना समजावले. मात्र, तोच राग मनात धरून व परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी या तिघांनी कारंडे यांचा धारदार शास्त्राने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्या घटनेला २ वर्ष पुर्ण झाल्यानंतर आता गणेश वाघमोडेचा खून (Crime News) झाला आहे.

रेकॉर्डवरील अल्पवयीन गुन्हेगाराचे नाव

बारामती शहरच्या जवळत असलेल्या जळोची येथे राहणाऱ्या गणेश नावाच्या अल्पवयीन गुन्हेगाराचा अज्ञात हल्लेखोरांनी खून केला आहे. काल बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास जळोची नजीक असलेल्या काळा ओढा परिसरामध्ये ही घटना घडली आहे. गणेश धुळाबापू वाघमोडे (वय १७ वर्ष) असं खून झालेल्या रेकॉर्डवरील अल्पवयीन गुन्हेगाराचे नाव आहे. अज्ञात हल्लेखोरांनी अल्पवयीन गुन्हेगार गणेश वाघमोडे याच्या डोक्यात घाव घालून त्याचा खून (Crime News) केला आहे. 

याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात सहा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील खून झालेला अल्पवयीन गुन्हेगार गणेश वाघमोडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून जुन्या भांडणाच्या कारणातून हा खून झाल्याचं बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांची पाच तपास पथके काल रात्रीच तैनात केली असून आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget