एक्स्प्लोर

Ajit Pawar : पवारांच्या दिवाळीत यंदा अजित पवार दिसणार नाहीत, स्वतःच कारण सांगितलं!

Baramati Sharad Pawar Family Diwali Celebration : आजारपणामुळे आपण अजून काही दिवस उपचार घेत असून यंदाच्या दिवाळीत कुणालाही भेटता येणार नाही असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. 

मुंबई: डेग्यूची लागण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून घरीच उपचार घेणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यंदा बारामतीत होणाऱ्या पवार कुटुंबीयांच्या दिवाळीत (Baramati Pawar Family Diwali Celebration) दिसणार नाहीत. आजारपणामुळे आपल्यापासून दूर रहावं लागत आहे, डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे यावेळी आपल्याला भेटता येणार नाही असा संदेश अजित पवारांनी दिला आहे.

राज्यभर दिवाळीचा उत्साह असताना सर्वाचं लक्ष लागलं असतं ते बारामतीच्या पवार कुटुंबीयांच्या दिवाळीकडे. दिवाळीच्या सणामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमधील निवासस्थानी सर्व पवार कुटुंबीय एकत्र येतं आणि दिवाळी साजरी केली जाते. यंदा मात्र अजित पवार त्या ठिकाणी जाऊ शकणार नाहीत हे स्पष्ट झालंय. 

दर दिवाळीला आपणा सर्वांना भेटत असतो, दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्ताने भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सूचनेनुसार आपल्याला भेटता येणार नाही असं अजित पवारांनी त्यांचे कार्यकर्त्यांना दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. आजारपणामुळे डॉक्टरांच्या सल्यानुसार सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार असल्याने आणखी काही दिवस जनतेला भेटता येणार नसल्याचे सांगत त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या दिवाळीला भेटता येणार नाही, अजित पवारांचा संदेश

अजित पवारांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, "गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळुहळु सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरे होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसेच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजाने दूर रहावे लागणे हे त्रासदायक आहे. दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्ताने भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सूचनेनुसार आपल्याला भेटता येणार नाही. मात्र, माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, कुटुंबियांना, नातेवाईक, मित्रपरिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो." 

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर आहेत. डेंग्यूची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. अजित पवार यांच्या प्रकृतीत हळुहळु सुधारणा होत असून डॉक्टरांच्या सल्यानुसार आणखी काही दिवस विश्रांती घेणार असल्याची माहिती आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi on Budget : पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे
Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Union Budget 2025 : टॅक्स स्लॅबमधील बदलांमुळे सरकारचा 1 लाख कोटींंचा महसूल घटणारABP Majha Headlines : 3 PM : दुपारी 3 च्या हेडलाईन्स : TOP Headlines 3PM 01 February 2024Eknath Shinde On Union Budget 2025 : बजेटमधून सर्वसामान्यांना लक्ष्मी प्रसन्न झाली : एकनाथ शिंदेUnion Budget 2025 : Superfast : अर्थ बजेटचा ; अर्थसंकल्पातून कुणाला काय काय मिळालं? 01 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on Budget : पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे
Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Manikrao Kokate : भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
Union Budget 2025 : इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Embed widget