Koregaun Bhima: कोरेगाव भीमा येथे 31डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत मद्यविक्रीस बंदी, शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
Pune: जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या कार्यक्रमची तयारीला वेग आला आहे. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या कालावधीत मद्य विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
![Koregaun Bhima: कोरेगाव भीमा येथे 31डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत मद्यविक्रीस बंदी, शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय Ban on sale liquor in pune Koregaon Bhima area on December 31 and January 1 yearend and new year Koregaun Bhima: कोरेगाव भीमा येथे 31डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत मद्यविक्रीस बंदी, शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/19/cd290f22e048b6b9f2642aa9366f55b11671437539294442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Koregaon Bhima : एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे (Koregaon Bhima) होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे. शौर्य दिनाच्या (pune) पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या कालावधीत भीमा कोरेगाव आणि त्या परिसरातली गावात मद्य विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यातील शिक्रापूरसोबतच लोणीकंद पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये असणारे देशी, विदेशी दारू, वाईन, बिअर, ताडी यासह मद्यविक्रीची दुकाने राहणार बंद राहणार आहेत. या बंदीच्या नियमाचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत. पुण्यातील कोरेगाव भीमा गावात विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहान साजरा केला जातो. यावेळी हजारो नागरिक एकत्र येत असतात. मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होते. त्या पार्श्वभूमी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठी खबरदारी घेतली जाते. त्यामुळे दारु विक्रीवर बंदी घातल्यात आली असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी विजयस्तंभ परिसरात नियोजनाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत त्यांनी आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, पीएमपीएमएल, अग्निशमन, विद्युत विभाग या विविध विभागांच्या नियोजनाचा आढावा घेतला होता. देशभरातील अनुयायी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांना सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. त्यासाठी प्रत्येक विभागाने समन्वयक अधिकारी नेमावा. येणाऱ्या अनुयायांना कोणतीही समस्या येणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि नियोजित वेळेत आवश्यक काम पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.जिल्हाधिकाऱ्यांनी वाहनतळ आणि इतर व्यवस्थेसंबंधी ठिकाणांना भेट देऊन तेथील तयारीचा आढावा घेतला होता. यावेळी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारीदेखील होते.
390 पीएमपीएमएल बसेसची सोय
कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. कोविडनंतर यावर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेत 16 ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे शहरातील विविध परिसरातून 390 पीएमपीएमएल बसेसची सोय करण्यात आली आहे. यामुळे अनुयायांच्या प्रवासाची उत्तम सोय होणार आहे. त्यासोबतच 400 तात्पुरती स्वच्छतागृहे, 20 रुग्णवाहिका, आरोग्य पथके, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, अग्निशमन वाहनं या सगळ्या व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)