एक्स्प्लोर

Asaram Bapu Pune : आसाराम बापूंना तातडीने जामीन द्या; पुण्यात बापूंच्या शिष्यांची मुक मोर्चातून मागणी

श्री आसाराम बापू यांच्या अटकेला 30 ऑगस्टला 9 वर्ष झाले तरीदेखील जामीन मिळाला नाही. त्यांना तातडीने जामीन मिळावा, या मागणीसाठी श्री योग वेदांत सेवा समिती साधक मंडळातर्फे मुक मोर्चा काढण्यात आला.

Asaram Bapu Pune : श्री आसाराम बापू यांच्या अटकेला 30 ऑगस्टला 9 वर्ष झाले तरीदेखील जामीन मिळाला नाही. त्यांना तातडीने जामीन मिळावा, या मागणीसाठी श्री योग वेदांत सेवा समिती साधक मंडळातर्फे मुक मोर्चा काढण्यात आला. शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शिष्यांनी काळ्या फिती लावून निषेध दर्शवला आहे.

सर्वांनी पांढऱ्या कपडे परिधान करून दंडाला काळया फिती लावल्या होत्या आणि हातात भगवे ध्वज घेतले होते.' बापू को रिहा करो ', ' संत न होते तो जल मरता संसार ', 'नही सहेंगे अत्याचार, झूठे आरोपोंका हो बहिष्कार', अशा अनेक प्रकारच्या घोषणांचे फलक साधकांनी हाती घेतले होते. न्यायालयीन प्रक्रिया संथ गतीने चालत असून न्याय मिळण्यात विलंब होत आहे, याची शासन, समाज आणि न्यायालयाने दखल घ्यावी, असे समितीच्या निवेदनात म्हटले आहे. शनीवारवाडा, लाल महाल,फडके हौद, दारूवाला पूल, 15 ऑगस्ट चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी चालून राष्ट्रपतींसाठीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात  देण्यात  आले.

लैंगिक शोषणाचा आरोप खोटा आहे. ते निर्दोष आहेत. भारत आणि भारताबाहेर देखील त्यांचे शिष्य आहेत. 80 कोटींपेक्षा जास्त त्यांच्या शिष्यांची संख्या आहे. जगाच्या आणि विश्वाच्या कल्याणासाठी त्यांनी आजपर्यंत मातृपितृ दिन साजरा केला. त्यासोबतच बालशिक्षण केंद्र आणि तुळशी पुजानाचा संदेश देखील त्यांनी दिला आहे. सनातन संस्कृती आणि इतर समाजाच्या लोकांनी देखील त्यांना मान्यता दिली आहे.  सगळ्या विश्वात त्यांचं विश्वगुरु म्हणून स्वागत केलं जातं. हा त्यांच्यावर अन्याय आहे, असं मत त्यांच्या शिष्यांनी व्यक्त केलं आहे.

हिन्दू धर्माच्या रक्षणासाठी ज्यांनी कार्य केलं त्या सगळ्यांवर अन्याय झाला आहे.  आसाराम बापूंवर जो आरोप झाला आहे. तो सिद्ध करण्यासाठी कोणाकडेच काहीही पुरावा नाही आहे. FIR मध्ये बलात्काराचा उल्लेख नाही आहे. मेडीकल रिपोर्टही नीट आहे. मुलगी देखील नाबालिक नाही आहे तर पोस्को अॅक्ट कसा लावला,असा  प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

अनेक आदिवासी भागांमध्ये हिन्दूंना धर्मांतरीत करुन प्रलोभने देऊन  ख्रिश्चन बनवण्यात येत होते. गुजरातच्या डांग जिल्ह्यातील आधिवासींना आसाराम बापूनी ख्रिश्चन धर्मातून घरवापसी केली. त्यामुळे ख्रिश्चन मिशनरी आणि काही कंपन्यांचाही या षडयंत्रात हात आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Iran : एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
Share Market : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
शेअर बाजारातील 'या' स्टॉकवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता, कमाईची संधी
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
Sunil Shelke : मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा; चित्रा वाघ यांच्या समोर महिला नेत्याचं बेताल वक्तव्य
मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा; चित्रा वाघ यांच्या समोर महिला नेत्याचं बेताल वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donkey soap : गाढविणीच्या दुधाने अंघोळ, काय असतं खास? Special Report
Periods Leave Policy : कोणत्या राज्यात मिळते मासिळ पाळी रजा? Special Reports
Iran : इराणमध्ये फाशीचं सत्र, दहा महिन्यात 1000 जण फासावर Special Report
Celebrity Marriage : अब्जाधीश वामसी गदिराजूंचा डोळे दीपवणारा लग्नसोहळा Special Report
Ayodhya Flag Ceremony : रामनगरी अयोध्येत धर्मध्वजारोहण सोहळ्याचा उत्साह

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
Share Market : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
शेअर बाजारातील 'या' स्टॉकवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता, कमाईची संधी
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
Sunil Shelke : मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा; चित्रा वाघ यांच्या समोर महिला नेत्याचं बेताल वक्तव्य
मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा; चित्रा वाघ यांच्या समोर महिला नेत्याचं बेताल वक्तव्य
Yugendra Pawar : आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं; युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप
आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं; युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप
IPL :राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठा निर्णय घेणार
राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Satara Politics : सातारा जिल्ह्यात सातारा कराडसह नऊ नगरपरिषदा आणि मेढा नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी कोण रिंगणात? यादी पाहा
सातारा जिल्ह्यात सातारा कराडसह नऊ नगरपरिषदा आणि मेढा नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी कोण रिंगणात? यादी पाहा
Silver Rate : चांदीच्या दरात आठवड्यात 8000 रुपयांची घसरण, सोन्याचे दर देखील घसरले, जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात आठवड्यात 8000 रुपयांची घसरण, सोन्याचे दर देखील घसरले, जाणून घ्या नवे दर
Embed widget