एक्स्प्लोर

आता, मसुरीत काय होणार, पूजा खेडकरांची निवड रद्द होणार का?; अविनाश धर्माधिकारींनी सांगितला अनुभव

पूजा खेडकर यांच्या अपंग आणि दिव्यांग प्रमाणपत्राचे प्रकरण गंभीर आहे, आणि या गांभीर्याने सरकार पुढचे पाऊल उचलत आहे.

पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर (pooja Khedkar) यांच्या आयएएस होण्यासाठीचे अनेक कारनामे समोर आल्यानंतर आता त्यांच्याविरुद्ध कारवाईला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. कारण, पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. तर, मसुरीतील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीमध्ये त्यांना परत बोलवण्यात आले. या प्रशिक्षण संस्थेने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली आहे. त्यामुळे, पूजा खेडकर यांचा पाय आणखी खोलात गेल्याचं आता स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे खेडकर कुटुंबीय पुण्याच्या बाणेरमधील बंगल्याला कुलूप लावून पळून गेले आहेत. तर, दुसरीकडे पूजा खेडकर यांची परतवारी सुरू झाल्याचं दिसून येत आहे. आता, याबाबत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी (Avinash Dharmadhirkari) यांनीही भूमिका मांडली आहे. तसेच, यापूर्वी दोन जणांची निवड रद्द झाल्याची माहितीही त्यांनी दिली. 

पूजा खेडकर यांच्या अपंग आणि दिव्यांग प्रमाणपत्राचे प्रकरण गंभीर आहे, आणि या गांभीर्याने सरकार पुढचे पाऊल उचलत आहे. विशेष म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेत पूजा खेडकर अजून कायम झालेल्या नाहीत, त्यांचे अद्याप प्रशिक्षण सुरू आहे. त्यामुळे, राज्य सरकारने जे पाऊल उचलले आहे, ते योग्य आहे, असे अविनाश धर्माधिकारी यांनी म्हटलं आहे. तसेच, याप्रकरणात कोणताही दबाव येऊ नये, दूध का दूध पानी का पानी व्हायला पाहिजे, अशी मागणीही धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.

यापूर्वी दोघांची निवड रद्द?

केंद्र सरकार आणि लाल बहादूर शास्त्री अकादमी यांनी हा तपास एका प्रकरणासाठी न ठेवता इतरांनी सुद्धा कोणी नियमांचा गैरफायदा घेतला नाही ना, हे देखील तपासून घेतलं पाहिजे. तसेच, याप्रकरणी कठोरपणे तपास झाला नाही तर व्यवस्थेला तडा जाईल. बोगस प्रमाणपत्रासंदर्भातील आरोप सिद्ध झाल्यास पूजा खेडकर यांच्यावर गंभीर कारवाई होऊ शकते, भारतीय प्रशासकीय सेवेत निवड रद्द झालेली याआधीची 2 प्रकरणे होऊन गेलेली आहेत, अशी माहितीही अविनाश धर्माधिकारी यांनी दिली. 

पूजा खेडकर यांना आता मुसरीत परत बोलवण्यात आले आहे. त्यामुळे, लाल बहादूर शास्त्री अकादमीमध्ये दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर यांना विविध प्रश्न विचारले जातील, तसेच कागदपत्रे सादर करावे लागतील, असे धर्माधिकारी यांनी सांगितले. तसेच, जो कोणी खोटं प्रमाणपत्र देत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

निलंबनाची कारवाई होऊ शकते

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांना वाशीम येथील प्रशिक्षण तात्काळ थांबवण्यास सांगितला असून त्यांना मसुरीत 23 जुलै पर्यंत बोलवण्यात आलं आहे, पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरुन तसेच त्यांच्या मातोश्री मनोरा खेडकर यांनी शेतकऱ्याला दाखवलेल्या पिस्तुलच्या व्हिडिओमुळे हे प्रकरण गाजलं होतं. त्याचबरोबर त्यांची बेहिशोबी मालमत्तेची देखील चर्चा होत आह, अखेर त्यांचं जे प्रशिक्षण थांबवण्यात आलं असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते, असं आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटलं आहे.

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Pune Visit: अमित शाहांनी रात्री पुण्यात पाऊल ठेवताच पोलिसांची वेगवान कारवाई, 'त्या' भीतीमुळे युवक काँग्रेसच्या चार तरुण पदाधिकाऱ्यांना उचललं
अमित शाहांनी रात्री पुण्यात पाऊल ठेवताच पोलिसांची वेगवान कारवाई, 'त्या' भीतीमुळे युवक काँग्रेसच्या चार तरुण पदाधिकाऱ्यांना उचललं
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, पुढची निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, जयकुमार गोरेंचा खोचक टोला
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, पुढची निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, जयकुमार गोरेंचा खोचक टोला
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
Pune Rain : पुणे जिल्ह्यात मुसळधार! खडकवासलासह तीन धरणं भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे जिल्ह्यात मुसळधार! खडकवासलासह तीन धरणं भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Commonwealth Games 2026 : हातातली बॅट सुटली, बापाचं छत्र हरपलं... पण पठ्ठ्याने इतिहास रचला! डेकाथलॉनमध्ये पदक जिंकणारा तेजस्विन शंकर ठरला पहिला भारतीय
हातातली बॅट सुटली, बापाचं छत्र हरपलं... पण पठ्ठ्याने इतिहास रचला! डेकाथलॉनमध्ये पदक जिंकणारा तेजस्विन शंकर ठरला पहिला भारतीय
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
माझी निवड झाली नाही, तू तरी...; 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने जीवन संपवले; भावाला लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील
माझी निवड झाली नाही, तू तरी...; 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने जीवन संपवले; भावाला लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Embed widget