Nandu Natekar : अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन
Nandu Natekar : अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
पुणे : अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू आणि 1960 च्या दशकातील भारतीय क्रीडा क्षेत्राचे हीरो असलेले नंदू नाटेकर यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे. ते 88 वर्षांचे होते. पुण्यात वृद्धफकाळानं त्यांचं निधन झालं. 1961 मध्ये सुरु झालेला अर्जुन पुरस्कार पहिल्यांदा प्राप्त करण्याचा मान नंदू नाटेकर यांना मिळाला होता.
नंदू नाटेकर हे मूळचे सांगलीचे राहणारे होते. मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. बॅडमिंटन क्रिडाप्रकारात त्यांनी भाराताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवलं. आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकणारे ते पहिले बॅडमिंटनपटू होते. तसेच भारत सरकारच्या अर्जुन पुरस्कारानं सन्मानित होणारे ते पहिले क्रीडापटू होते. बॅडमिंटनप्रमाणे त्यांनी इतर खेळातही प्राविण्य मिळवलं होतं. क्रिकेट, टेनिस या क्रिडाप्रकारांतही त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजवल्या होत्या.
15 वर्षांच्या कारकिर्दीत 100 पेक्षा जास्त स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यात 17 राष्ट्रीय विजेतेपदांचा समावेश आहे. 1954 मध्ये त्यांनी ऑल इंग्लंड स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...)