एक्स्प्लोर

मराठवाड्यात अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पावसाने एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं; रस्ते पाण्याखाली, गावांचा संपर्क तुटला

सर्वच जिल्ह्यात बेफाम पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटलाय.  

Marathwada rain update: राज्यभरात सध्या पावसाचा जोरदार तडाखा बसत असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ढगफुटीसदृश्य पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः खरडून गेल्या आहेत. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रात्रीतून झालेल्या पावसाने झोडपले आहे . या पावसामुळे मोठ्या प्रमाणात ओढ्यांना पूर  आला असून अनेक गावांमधील घरांमध्ये पाणी शिरले आहे.  लातूर, बीड, धाराशिव ,छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी ,हिंगोली अशा सर्वच जिल्ह्यात बेफाम पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटलाय.  

परभणीत काल रात्री झालेल्या वादळी पावसाने पारंपरिक पिकांसह नगदी पिकं यंदाच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातून हिरावून घेतले आहेत. लातूरमध्ये मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या तुफान पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे भेटा आंदोरा गावचा संपर्क तुटलाय. जालन्यात रात्रभर झालेल्या पावसाने नद्या नाले एक झालेत. शेती पिक पाण्याखाली बुडाली असून अनेकांच्या घरात पाणी शिरले. अंबड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला.

बाजारपेठेत पाणी शिरले; पूरसदृश्य परिस्थिती

 विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्री पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला झोडपून काढले. शिरूर कासारमध्ये दमदार पाऊस झाला असून सिंदफना नदीला पूर आला आहे. आणि याच पुराचे पाणी परिसरातील घरांमध्ये दुकानांमध्ये शिरले आहे. शिरूर शहरातून वाहणाऱ्या सिंदफणा नदीने रौद्ररूप धारण केले असून तहसील प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मध्यरात्री अचानक दमदार पाऊस झाला आणि त्यामुळे ही पूरसदृश्य परिस्थिती दिसून येते आहे. घरांसह नदीकाठचे दुकानं सध्या पाण्यात आहे.. सुदैवाने कसलीही जिवितहानी झाली नाही.बीडच्या शिरूर येथील सिंदफणा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. मध्यरात्री झालेल्या पावसाने नदीकाठच्या परिसरात दाना दान उडाली आहे. अनेक घरांसह दुकानात पाणी शिरले असून मोठे नुकसान झाले आहे. 

मराठवाड्यात अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पावसाने एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं; रस्ते पाण्याखाली, गावांचा संपर्क तुटला

धाराशिवच्या भूम आणि परांडा तालुक्यात पावसाचा हाहाकार

चांदणी नदीने रौद्ररूप धारण केले असून चावडी शाळा व घराघरात पाणी साचले आहे, यामुळे गावकऱ्यांच्या नुकसान झाले असून, घराघरात पाणी सुचल्या जीवनावश्यक वस्तूचे होते नुकसान झाले असून मोठे नुकसान झाले आहे. शेती पिकांचे हे अतोनात नुकसान झाले असून लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी ही करण्यात येत आहे. शिरसाव तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथे नदीला महापूर आल्यामुळे नदीच्या पलीकडे जवळपास 200 -300 लोक अडकलेले आहेत.

मराठवाड्यात अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पावसाने एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं; रस्ते पाण्याखाली, गावांचा संपर्क तुटला

लातूर जिल्ह्यातील भेटा परिसरात रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे भेटा–अंदोरा या गावाचा संपर्क तुटला आहे. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाला आहे. भेटा ते अंदोरा या मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे या रस्त्यावरून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, वारंवार मागणी करूनही  पुलाची उंची वाढवली नाही. त्यामुळे  पावसाळ्यात अशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. भादा मंडळातील भेटा ,अंदोरा,वडजी, काळमाथा,बोरगाव,जायफळ,नाहोली,बऱ्हाणपूर, कवठाकेज या गावच्या शेतशिवारात जोरदार पाऊस झाला आहे

शेताला तलावाच स्वरूप, शेतकऱ्यांच अतोनात नुकसान...

जालना जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून जालना, घनसावंगी आणि बदनापूर तालुक्यामध्ये रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या भागात काल मध्यरात्री मुसळधार झालेल्या पावसाने  जालना तालुक्यातील सेवली,धारा, पाथरूड, उमरी, शिवनगर ,उखळी, या परिसरात शेतांना तलावाचे स्वरूप आलय, तर रस्त्यावरून नद्या वाहत आहेत . या पावसामुळे नद्यांना ओढ्यांना पूर आला असून शेतातील उगपिक पाण्याखाली गेला. 

मराठवाड्यात अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पावसाने एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं; रस्ते पाण्याखाली, गावांचा संपर्क तुटला

अंबड तालुक्यातील अनेक गावात मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने नद्या नाले एक झालेत. अंबड तालुक्यात मध्यरात्री झालेल्या पावसामुळे मागणी नदीला पूर आला असून, नालेवाडी शिवारात साठवण तलाव भरून वाहत असल्याने गावात पाणी शिरलय. शेतातील पीक पाण्याखाली बुडाली असून अनेकांच्या घरात पाणी शिरलाय.अंबड तालुक्यातील रेनापुरी, दयाळा ,भांबेरी या गावांचा नद्या नाले एक झाल्याने संपर्क तुटलाय.

वाकी नदीला पुन्हा एकदा पूर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहाटेपासून कुठे मध्यम, तर कुठे जोरदार पाऊस बरसतो आहे. या पावसामुळे कन्नड तालुक्यात वाकी नदीला पुन्हा एकदा पूर आला। ढगफुटी सदस्य पाऊस झालाय दुसरीकडे पैठण तालुक्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली .पैठण शहरालगत असलेल्या राहुल नगर भागात 100 घरात पाणी शिरले ।इकडे वाकी गावातही अनेक घरात पाणी शिरल्याचा समोर आलाय.

माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडले 

माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणातून सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.माजलगाव धरणाचे 11 वक्री दरवाजे सध्या उघडण्यात आले असून सिंदफणा नदीपात्रात 62000 क्युसेक इतका पाण्याचा मोठा विसर्ग केला जात आहे.दरम्यान सिंदफणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय.धरणातील पाण्याची आवक पाहता निसर्ग वाढवणे अथवा कमी केला जाऊ शकतो अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
Nanded Crime Love Story: नांदेडच्या प्रेमप्रकरणाचा जातीय विखारामुळे भयंकर शेवट, सक्षम ताटेची केस प्रकाश आंबेडकर लढवणार का? अंजली आंबेडकर म्हणाल्या...
सक्षम-आचलला न्याय देण्यासाठी प्रकाश आंबेडकर कोर्टात युक्तिवाद करणार? अंजली आंबेडकर म्हणाल्या...
Weakest Currency 2025 : डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन कोणते? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन कोणते? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट
Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
Nanded Crime Love Story: नांदेडच्या प्रेमप्रकरणाचा जातीय विखारामुळे भयंकर शेवट, सक्षम ताटेची केस प्रकाश आंबेडकर लढवणार का? अंजली आंबेडकर म्हणाल्या...
सक्षम-आचलला न्याय देण्यासाठी प्रकाश आंबेडकर कोर्टात युक्तिवाद करणार? अंजली आंबेडकर म्हणाल्या...
Weakest Currency 2025 : डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन कोणते? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन कोणते? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
बेळगावात अग्निवीरांचा शानदार दीक्षांत समारंभ; 31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण
बेळगावात अग्निवीरांचा शानदार दीक्षांत समारंभ; 31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं गाठला उच्चांक, सोनं 957 रुपयांनी महागलं, 24 कॅरेट, 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या 
चांदी 4034 रुपयांनी महागली, नवा उच्चांक गाठला, सोनं 957 रुपयांनी महागलं, सोन्याचा दर किती? जाणून घ्या
Nagarparishad Election EVM: नगरपरिषद निवडणुकीचं मतदान संपताच EVM मशीनचं सील तोडलं? गोंदियातील स्ट्राँग रुममध्ये नक्की काय घडलं?
मोठी बातमी: नगरपरिषद निवडणुकीचं मतदान संपताच EVM मशीनचं सील तोडलं? गोंदियातील स्ट्राँग रुममध्ये नक्की काय घडलं?
सांगलीत राडा; स्ट्र्राँग रुमबाहेर मोठ्या संख्येनं जमले लोकं; नगरपालिकेसाठी झालेल्या मतदानात 2900 मतांचा फरक
सांगलीत राडा; स्ट्र्राँग रुमबाहेर मोठ्या संख्येनं जमले लोकं; नगरपालिकेसाठी झालेल्या मतदानात 2900 मतांचा फरक
Embed widget