पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात गुन्हेगारांचा राडा, हातात धारधार हत्यारे घेऊन घातला नंगानाच
पुण्यातील विश्रांतवाडीतील कळसमध्ये गुन्हेगारांनी हातात धारधार हत्यारे घेऊन नंगानाच घातला आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या या टोळक्याने फोडल्या आहेत.
पुणे : विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आले. विश्रांतवाडीतील कळसमध्ये गुन्हेगारांनी हातात धारधार हत्यारे घेऊन नंगानाच घातला आहे.
कळसमध्ये दोन गटात झालेल्या वादात तरुणांच्या टोळक्याने हातात हत्यारे घेऊन परिसरात दहशत माजवली. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या देखील या टोळक्याने फोडल्या आहेत. टोळक्याच्या या नंगानाचाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात हातामध्ये हत्यारे घेऊन काही तरूण राडा घालत असल्याचे दिसत आहेत. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गोंधळ घालणाऱ्या दोन्ही गटातील संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे धानोरीतील मुंजाबा वस्तीमध्ये देखील आठ ते दहा जणांच्या टोळक्याने कोयते, तलवारी, दांडके घेऊन दुकाने आणि टपऱ्यांची तोडफोड करत आरडाओरडा करून दहशत माजवली होती. त्यामुळे एकंदरीतच विश्रांतवाडी पोलिसांचा गुन्हेगारावरील वचक कमी झाला असल्याने हद्दीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याची चर्चा आहे.
या टोळक्याने राडा घालत रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक गाड्या फोडल्या आहेत. काही रिक्षांचीही तोडफोड केली आहे. लोकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या टोळक्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. सतत होणाऱ्या अशा घटनांमुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- PMPML : पुण्यात पीएमपीएल प्रवासासाठी युनिव्हर्सल पासची सक्ती, आजपासून होणार अंमलबजावणी
- केंद्राकडून शरद पवारांना पद्म पुरस्कार, मात्र देवेंद्र फडणवीसांना त्याचा विसर; सुप्रिया सुळे यांची टीका
- Omicron : देशात कोरोनाचा कहर, ओमायक्रॉनचा संसर्गही कायम; महाराष्ट्र, दिल्लीत रुग्णवाढ मंदावली
- Coronavirus : चहा ऐवजी 'या' तीन काढ्यांचे करा सेवन, संसर्गापासून होईल संरक्षण, चवही कायम