एक्स्प्लोर

Blockchain Wedding : पुण्यात चक्क ब्लॉकचेनद्वारे विवाहसोहळा, देशातील अशाप्रकाराचं पहिलेच लग्न

Blockchain Wedding : तुम्ही अनेक प्रकारची लग्न पाहिली असतील. पारंपारिक, रजिस्टर, वैदिक, ऑनलाईन अशाप्रकरची लग्ने तुम्ही पाहिली असतील. पण कधी डिजिटल लग्न झालेलं ऐकलं, पाहिलं आहे का?

Blockchain Wedding : तुम्ही अनेक प्रकारची लग्न पाहिली असतील. पारंपारिक, रजिस्टर, वैदिक, ऑनलाईन अशाप्रकरची लग्ने तुम्ही पाहिली असतील. पण कधी डिजिटल लग्न झालेलं ऐकलं, पाहिलं आहे का? होय, पुण्यात चक्क डिजिटल लग्न झाले आहे. असं लग्न करणारे हे देशातील पहिलेच दाम्पत्य ठरले आहे. या लग्नाला भटजी देखील ऑनलाईनच होते. 

कोरोना महामारीमध्ये अनेकांनी छोट्या पद्धतीने लग्न केली आहेत. लग्नाला फक्त मोजक्याच लोकांना उपस्थित राहाता येत होतं. त्यामुळे अनेकांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. पण पुणे शहरात राहणाऱ्या अनिल आणि श्रुती नायर यांनी कोरोना महामारीदरम्यान लग्न करण्याचा हटके पर्याय निवडला आहे. या दोघांनी ब्लॉकचेन (Blockchain) टेक्नॉलॉजीद्वारे लग्न  केलं आहे. हे डिजिटल लग्न सध्या चर्चेचा विषय आहे. असं लग्न करणारे हे देशातील पहिलेच जोडपे ठरले आहे. 

नोव्हेंबर 2021 मध्ये अनिल आणि श्रुती यांनी ऑनलाइन लग्न (Online Wedding) करण्याचा निर्णय घेतला होता. डिजिटल भटजींनी त्यांचे लग्न लावले होते. अनिलने Linkedin वर याबाबतची पोस्ट करत सांगितले की, लग्नाला ब्लॉकचेन ऑफिशियल केलं आहे. ज्यामध्ये Ethereum स्मार्ट कॉन्ट्रॅक्टही केलं.  अनिल आणि श्रुती यांनी OpenSea वर NFT (नॉन-फंजिबल टोकन) स्वरूपात एकमेकांविषयी वचनबद्धता दाखवली. 

अंगठीच्या फोटोद्वारे NFT तयार करण्यात आला आहे. यामध्ये दाम्पत्याच्या वचनांना अँबेड करण्यात आले आहे. यामध्ये कोणत्याही मोठ्या वचनांचा समावेश नाही. मतभेद आणि भांडणांमध्ये ते एकमेकांना आणि स्वतःला चांगले समजून घेण्याची आशा करतात, असे वचनांमध्ये म्हटले आहे. त्यात असेही म्हटलेय की, एकमेकांसाठी ते संपूर्ण झोकून देतील, असेही नाही. पण आयुष्यभर प्रत्येक क्षणाला एकमांना साथ देतील. आयुष्यातील प्रत्येक सुख दुखाच्या क्षणाला एकमेंकासाठी उभे राहतील.  

लग्नासोहळ्यात काय झाले?
अनिल आणि श्रुतीने लग्नासोहळ्यासाठी क्रिप्टोकरेन्सी वॉलेटचा सेटअप केला होता. अनिल म्हणतो, 'आमचे डिजिटल भटजी अनूप पाकी यांनी OpenSea वर NFT केले आणि ते मला पाठवले. ' त्यानंतर दाम्पत्य आपापल्या लॅपटॉपसोबत एकत्र बसले. परिवार आणि मित्रांनी या लग्नाला गूगल मीटद्वारे उपस्थिती दर्शवली. अनिलने आपल्या  Linkedin पोस्टमध्ये सांगितले की, ट्रांजॅक्शन फक्त 15 मिनटांच्या सोहळ्यात पूर्ण केलं. आम्ही एकमेंकाना वचनबद्ध झाल्यानंतर भटजींचा आशिर्वाद घेतला. त्यानंतर भटजींनी ट्रांजॅक्शनला कन्फर्म केलं. त्यानंतर एनएफटीला पत्नीच्या डिजिटल वॉलेटमध्ये ट्रान्सफर केलं.  ट्रांजॅक्शन पूर्ण झाल्यानंतर अनिल आणि श्रुती यांना पती-पत्नी म्हणून घोषित करण्यात आले.   अनिलने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, ब्लॉकचेन टेक्नॉलजीद्वारे लग्न करणारे आम्ही पहिले आहोत. पण शेवटचे नक्कीच नाहीत. क्रिप्टोकरेन्सी आणि ब्लॉकचेन आपल्या ट्रांजॅक्शनच्या पद्धतीमध्ये मोठा बदल घेऊन आले आहेत. आम्हाला विश्वास आहे की, यावर आपण विश्वास ठेवू शकतो.  

काय आहे NFT? 
NFT (नॉन फंजीबल टोकन) ही डिजिटल मालमत्ता आहे. जी कला, संगीत, व्हिडिओ, व्हिडिओ गेम आणि फोटो यांचे प्रतिनिधित्व करते. विशिष्ट प्रकारच्या कोडच्या आधारावर याची खरेदी आणि विक्री केली जाते. पण याचे स्वत:चं असं स्पष्ट अस्तित्व नाही. खरेदीदार आणि विक्रेते सहसा एनएफटीच्या विक्री आणि खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यापार करतात. NFT हा डिजिटल मालमत्ता किंवा डेटाचा एक प्रकार आहे आणि याचे व्यवहार ब्लॉकचेनवर रेकॉर्ड केले जातात. नॉन-फंजिबल टोकनमध्ये एक आयडी कोड असतो. त्यामुळे दोन एनएफटी कधीही एकमेकांशी जुळत नाहीत. त्याचबरोबर त्यांची नक्कलही करता येत नाही.
 
ब्लॉकचेन टेक्नोलॉजी काय आहे?
ब्लॉकचेन टेक्नोलॉजी एक प्लेटफॉर्म आहे, जिथे फक्त डिजिटल करन्सीच नाही तर कोणतीही गोष्ट डिजिटल बनवून त्याचा रेकॉर्ड ठेवला जाऊ शकतो. ब्लॉकचेनला क्रिप्टोकरन्सीजचा बॅकबोन म्हटले जाते. पण याचा वापर फक्त क्रिप्टोकरन्सीमध्ये नाही तर इतर काही क्षेत्रातही केला जातो. ही एक सुरक्षित आणि डिसेंट्रलाईज्ड टेक्नोलॉजी आहे, हे हॅक करणे कठीण असल्याचे तज्ज्ञांचं मत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

घाटकोपर होर्डिंग प्रकरणात मोठा खुलासा; निलंबित आयपीएस कैसर खालिद यांच्याविरोधात पुरावे सापडले, आता ACB करणार चौकशी
घाटकोपर होर्डिंग प्रकरणात मोठा खुलासा; निलंबित आयपीएस कैसर खालिद यांच्याविरोधात पुरावे सापडले, आता ACB करणार चौकशी
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Mumbai Heavy Rain: मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बँटिंग, रस्त्यांना तळ्याचं स्वरुप, कामावर जाणाऱ्यांची कोंडी अटळ
मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बँटिंग, रस्त्यांना तळ्याचं स्वरुप, कामावर जाणाऱ्यांची कोंडी अटळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Rain : मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस, जागोजागी साचलं पाणीRadhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घाटकोपर होर्डिंग प्रकरणात मोठा खुलासा; निलंबित आयपीएस कैसर खालिद यांच्याविरोधात पुरावे सापडले, आता ACB करणार चौकशी
घाटकोपर होर्डिंग प्रकरणात मोठा खुलासा; निलंबित आयपीएस कैसर खालिद यांच्याविरोधात पुरावे सापडले, आता ACB करणार चौकशी
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Mumbai Heavy Rain: मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बँटिंग, रस्त्यांना तळ्याचं स्वरुप, कामावर जाणाऱ्यांची कोंडी अटळ
मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बँटिंग, रस्त्यांना तळ्याचं स्वरुप, कामावर जाणाऱ्यांची कोंडी अटळ
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Embed widget