एक्स्प्लोर
Pune Accident News : वाघोलीत सलग दुसऱ्या दिवशी डंपरचा अपघात, दुचाकीस्वाराला उडवलं, तरुण गंभीर जखमी
Pune Accident News : पुणे शहरातील वाघोली केसनंद परिसरामध्ये काल डंपरने 9 जणांना चिरडले होते. यानंतर सलग दुसऱ्या दिवशी वाघोलीत डंपरचा अपघात झालाय.
Pune Accident News : पुणे शहरातील वाघोली केसनंद परिसरामध्ये रविवारी रात्री भीषण अपघात (Pune Wagholi Accident) झाला होता. अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या 9 जणांना डंपरने चिरडलं. पुण्यात काम शोधण्यासाठी आलेल्या या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने 9 जणांना चिरडले. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला. तर 6 जण गंभीर जखमी झाले. ही घटना ताजी असतानाच वाघोलीत सलग दुसऱ्या दिवशी डंपरचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोलीत हायवा डंपरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. साईराज देशमुख असे या जखमीचे नाव आहे. वाघोलीतील वाघेश्वर मंदिर या ठिकाणी अपघात झाला. काल वाघोलीत केसनंद फाट्यावर एका डंपरने नऊ जणांना चिरडल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी डंपरचा अपघात झालाय. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.
नऊ जणांना चिरडल्याप्रकरणी डंपर चालकाला पोलीस कोठडी
दरम्यान, वाघोलीमध्ये डंपरने ९ जणांना चिरडल्याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अपघाताप्रकरणी डंपर चालक गजानन तोटरे याच्यावर वाघोली पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची शासकीय मदत, तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाकडून केला जाणार आहे.
जालन्यात बसचा भीषण अपघात, 16 प्रवासी जखमी
जालना येथे देखील आज बसचा भीषण अपघात झाला आहे. जालना जिल्ह्यातील जाफ्राबादहून चिखलीकडे जाणाऱ्या बसला कोळेगाव फाट्याजवळ भीषण अपघात झाला. कोळेगाव घाटरस्ता चढताना बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातात 15 ते 16 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींमधील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना चिखली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
जळगावात बस उलटली, एक ठार
गुजरात राज्याकडून अकोला येथे जाणाऱ्या लक्झरी बसचा (Bus Accident) जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत एक महिला जागीच ठार तर, दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जळगाव (Jalgaon Accident News) येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आणखी वाचा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement