Anjali Damania: धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडांच्या अडचणी वाढल्या; अंजली दमानियांच्या मुख्यमंत्र्यांकडे 10 मागण्या
Anjali Damania on Dhananjay munde: मुख्यमंत्र्यांसोबतच्या या भेटीमध्ये अंजली दमानिया यांनी काही मागण्या देखील केल्या आहेत, त्यांच्या या मागण्यामुंळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) राजीनाम्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी, संघटनांनी आणि सत्तेतील नेत्यांनीही राज्य सरकारवर दबाव टाकायला सुरूवात केली आहे. दरम्यान, काल (सोमवारी) धनजंय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा रंगल्या, तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी देखील काम( सोमवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बीडमधील हत्याप्रकरणावरून त्यांना मिळत असलेल्या धमक्यांसदर्भात माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या या भेटीमध्ये काही मागण्या देखील केल्या आहेत, त्यांच्या या मागण्यामुंळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केलेल्या मागण्या आणि पत्र यांची माहिती त्यांच्या सोशल मिडिया अकांउंटवरून शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांचे संबंध, पोलिस अधिकारी, तपास अधिकारी, बिंदुनामावली, पवन चक्की या संदर्भात काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
अंजली दमानिया यांच्या मागण्या काय?
काल मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र व प्रमुख मागण्या
१. संतोष देशुखांच्या हत्येच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे
२. धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांच्या अतिशय जवळचे आहेत म्हणून त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे
३. SIT बरखास्त करुन बीड जिल्ह्या बाहेरचे चांगले ऑफिसर च्या ऑफिसर्स नी तपास करावा .
४. तपास on camera झाला पाहिजे.
५. बीड मधे एक hotline नंबर सुरू करण्यात यावा. तक्रार देणाऱ्यांची गुप्तता
बाळगण्यात यावी.
६. बिंदुनामावली बीड मधे पळाली जात नाही. त्याची सत्यता बघण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात यावे.
७. सगळे सत्र परवान्यांची चौकशी करण्यात यावी
८. परळी Thermal project येथे एक स्पेशल फ़ोर्स लावण्यात यावा व हा परिसर सीसीआयटी ने कवर करण्यात यावा. राख माफिया बंद करण्यासरही हे करण्यात यावे
९. ज्या वाहनांना वर नंबर प्लेट्स नाही अशी सगळी वाहने जप्त करण्यात यावी
१०. पवन चक्कीची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात यावी व यातून येणारे भाडे हे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यावे
काल मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र व प्रमुख मागण्या
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 7, 2025
१. संतोष देशुखांच्या हत्येच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे
२. धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांच्या अतिशय जवळचे आहेत म्हणून त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे
३. SIT बरखास्त करुन बीड जिल्ह्या बाहेरचे चांगले ऑफिसर च्या ऑफिसर्स… pic.twitter.com/fwU3jjhske
धनंजय मुंडेंना जनाची नाही तर मनाची हवी
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे कसे संबंध आहेत, व्यवहार एकत्र आहेत, जमिनी एकत्र आहेत, कंपनी एकत्र आहे, दहशत एकत्र आहे. याबाबतचे हजारो व्हिडीओ समोर आले असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. एवढं सगळं होऊनही धनंजय मुंडेंना जनाची नाही मनाचीही लाज वाटत नसेल की आपण राजीनामा दिला न पाहिजे तर ही कठीण परिस्थिती असल्याचे दमानिया म्हणाल्या. मुंडे जोपर्यंत राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत लढायला हवं असेही दमानिया म्हणाल्या. चौकशीच पदोपदी नवनवीन माहिती समोर येत आहे.