एक्स्प्लोर

पुण्यात एकहाती सत्ता राखण्यासाठी भाजपची खेळी; उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्यांना पुन्हा संधी

सन2017 मधील नगरसेवकांना भाजप पुन्हा संधी देणार आहे. त्यानुसार, भाजपकडून 100 उमेदवारांची यादी फायनल झाली असून त्यात माजी नगरसेवकांची नावंही फायनल झाल्याची माहिती आहे.

पुणे : महापालिकेत एकहाती सत्ता कशी मिळेल, यासाठी भाजपने चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे. पुणे (Pune) महापालिकेसाठी उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत निर्णय घेण्यासाठी बुधवारी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक एका हॉटेलमध्ये झाली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, महापालिका निवडणूक (Election) प्रमुख गणेश बीडकर, राजेश पांडे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली असून भाजपची यादी निश्चित झाल्याचे समजते. भाजपकडून 100 हून अधिक जुन्याच नगरसेवकांना संधी दिली जात असून ही यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे लवकरच पोहोचणार आहे. 

सन2017 मधील नगरसेवकांना भाजप पुन्हा संधी देणार आहे. त्यानुसार, भाजपकडून 100 उमेदवारांची यादी फायनल झाली असून त्यात माजी नगरसेवकांची नावंही फायनल झाल्याची माहिती आहे. पुण्यातील सगळ्या विधानसभा मतदारसंघातील आढावा घेऊन जुन्या नगरसेवकांना संधी देण्याचं भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निश्चित करण्यात आलं आहे. भाजपचे 2017 मध्ये 99 उमेदवार निवडून आले होते, तर एकाने त्यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांवेळी ठाकरे गटातील 5 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे, या सर्व नगरसेवकांसह 125 जागा निवडून आणण्याचा भाजपचा दावा आहे. पुण्यातील भाजप आमदार आणि स्थानिक नेते देवेंद्र फडणवीसांकडे त्यांची यादी सादर करणार आहेत. त्यामुळे, भाजपच्या या यादीत किती आणि कोणत्या नवीन उमेदवारांना संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पुण्यात महापालिकेच्या 162 जागा

162 पैकी 99 जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले. हा निकाल पुण्यातील मध्यमवर्गीय, आयटी कर्मचारी आणि नव्या मतदारांचा कल भाजपकडे वळल्याचे दर्शवणारा ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) 39 जागा मिळाल्या, मात्र काँग्रेस 9 आणि शिवसेनेला केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले. मनसेने 2 आणि AIMIM 1 जागा मिळवली, मात्र, यांचा प्रभाव मर्यादित राहिला. तर 4 जागा अपक्ष उमेदवारांनी मिळवल्या होत्या. या निकालानंतर पुण्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांतही भाजपचे वर्चस्व कायम राहिले. त्यामुळे भाजप हा पुण्यातील प्रमुख राजकीय पक्ष म्हणून प्रस्थापित झाला.

नवी मुंबईत वाटाघाटी सुरूच, भाजप 80 जागांसाठी आग्रही

नवी मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना युतीची दुसरी बैठक पार पडली आहे, भाजपाकडून 80 जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय. तर शिवसेनेने भाजपापुढे 57 जागांचा प्रस्ताव मांडला आहे. महानगरपालिकेत एकूण 111 नगरसेवक संख्या आहे, त्यामुळे युती करण्यास अडचण निर्माण होत आहे. एकाच घरात तीन ते चार सीट देण्यास आपला विरोध आहे, भाजपात हे होऊ देणार नाही, याबाबत वरिष्ठांना सांगणार अशी भूमिका भाजप नेत्या तथा आमदार मंदा म्हात्रे यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणूकीत संदीप नाईक यांनी बंडखोरी केली असताना बेलापूर विधानसभेतील सर्व 25 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. संदीप नाईक यांचा परत भाजपा प्रवेश झाला आहे. राष्ट्रवादीत गेलेले नगरसेवक परत भाजपात आले आहेत. मात्र, मला विधानसभेत निवडून आणणाऱ्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, त्यांना उमेदवारी देण्यासाठी पक्षश्रेष्ठीकडे भांडणार, असेही मंदा म्हात्रे यांनी सांगितले. 

हेही वाचा

उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
Ketan Agrawal Case: 'मी घरासाठी सून आणायला गेलो होतो, पण मुलगाच गमावला'; केतन अग्रवालच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला!
'मी घरासाठी सून आणायला गेलो होतो, पण मुलगाच गमावला'; केतन अग्रवालच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला!

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget