शिवतारेंना माघार घेताना कोणतं आश्वासन दिलं? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मला दिलेलं आश्वासन लोकांना सांगावं, बापूंचा आग्रह
Vijay Shivtare: बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेताना विजय शिवतारेंना एक आश्नासन देण्यात आलं. दरम्यान नेमकं कोणतं आश्वासन देण्यात आलं याची उत्सुकता पुरंदरमध्ये आहे.
पुणे : बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात विजय शिवतारे (Viijay Shivtare) यांनी आपली बंडाची तलवार नुकतीच म्यान केली आहे. वर्षा बंगल्यावर मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला होता. मी केवळ एकनाथ शिंदे यांनी अडचण होऊ नये, म्हणून बारामतीमधून लढण्याचा निर्णय मागे घेत आहे, असे विजय शिवतारे यांनी सांगितले होते. त्यानंततर आज बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीची जाहीर सभा होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडून शिवतारेंना कोणते आश्वासन दिले हे जाहीर होणार असल्याने सभेची मोठी उत्सुकता पुरंदरमध्ये आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेताना विजय शिवतारेंना एक आश्नासन देण्यात आलं. दरम्यान नेमकं कोणतं आश्वासन देण्यात आलं याची उत्सुकता पुरंदरमध्ये आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन त्यांनी लोकांना येऊन सांगावं असा आग्रह विजय शिवतारेंनी धरलाय. सासवडच्या पालखीतळावर शिवतारे यांनी नागरिक संवाद मेळावा आयोजित केलाय या मेळाव्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या मेळाव्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिवतारेंचा आश्वासनाचा आग्रह पूर्ण करणार का याकडे लक्ष लागलंय.
पुरंदरचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावे : विजय शिवतारे
या विषयी बोलताना विजय शिवतारे म्हणाले, हा शेतकरी जनसंवाद मेळावा आहे. त्याचे कारण असे आहे की 27 मार्चला माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी जी चर्चा झाली आणि त्यांनंतर संघर्ष न करता आम्ही तहामध्ये सहभागी झालो. या तहामध्ये आम्ही पुरंदराच्या विकासाच्या दृष्टीने जे मोठे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करावे अशा मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पालखीतळ मैदानावर यावे आणि जनतेशी संवाद साधावा आणि आम्ही माघार का घेतली याविषयी सांगितले आहे.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी आणि विजयराव बसलो होतो. त्याच वेळेस त्यांचे काही महत्त्वाचे त्या भागातले विषय आहेत व पिण्याचा पाण्याचा,शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे असे काही त्यांचे विषय आहेत. त्या विषयाच्या संदर्भामध्ये त्यांनी चर्चा केली ते म्हणाले की, महायुतीच्या बरोबर आहे. परंतु हे विषय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मार्गी लावले पाहिजेत. काही पुरंदर विधानसभा मतदारसंघ आणि काही बारामती लोकसभा मतदारसंघ भोरमधला काही भाग आहेत. इतर भागातले, बारामती भागातले अशा वेगवेगळ्या भागातले त्यांचे विषय आहेत. त्या विषयाला कुठेतरी मदत व्हावी त्या दृष्टीकोनातून आमची चर्चा झाली. त्याच वेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की मी एक दिवस सभा आयोजित करतो त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावे असा शब्द दिला होता.
हे ही वाचा :