(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Wari 2022: 'या' कारणामुळे अजित पवारांचा देहू दौरा रद्द; रोहित पवार, सुनेत्रा पवार उपस्थित
हवामान बिघाडामुळे हेलिकॉप्टरचं उड्डाण रद्द झालं.त्यामुळे अचानक अजित पवारांना तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठीचा देहू दौरा रद्द करावा लागला, अशी माहिती मावळचे आमदार सुनिल शेळकेंनी दिली आहे.
Ashadhi Wari 2022: देहूमधून आज संत तुकाराम महाराज यांच्या 337 व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हजर राहणार होते. मात्र हवामान बिघाडामुळे हेलिकॉप्टरचं उड्डाण रद्द झालं.त्यामुळे अचानक तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठीचा देहू दौरा रद्द करावा लागला, अशी माहिती मावळचे आमदार सुनिल शेळकेंनी दिली आहे. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांनी हजेरी लावली आहे.
मुंबईत विधान परिषदेच्या निवडणुका सुरु आहेत. त्यात हवामान खराब आहे. त्यामुळं अजित पवार देहूतील प्रस्थानाला पोहचू शकले नाहीत. राज्यात पाऊस पडावा, राजकीय सूड घेण्याची वृत्ती संपावी, असं साकडं त्यांनी यावेळी घातलं. विधान परिषदेत महाविकासाआघाडीचे उमेदवार निवडून येतील, यात शंका नाही, असा विश्वास आमदार रोहित पवारांनी दर्शवला आहे.
देहू पालखी सोहळ्याचे प्रस्थान सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हजर राहणार होते. मात्र वातावरण नीट नसल्यामुळे हेलिकॉप्टरचं उड्डाण रद्द झाल्यामुळे त्यांनी अचानक तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठीचा देहू दौरा रद्द करावा लागला. प्रस्थान सोहळ्याला मला उपस्थित राहता आलं. विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार व्यस्त आहेत मात्र मला येण्याचा योग आला. अतिशय पारंपरिक पद्धतीने प्रस्थान सोहळा पार पडला. राज्यात पाऊस पडावा, राज्य सुजलाम सुफलाम व्हावं असं साकडं अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी तुकोबा चरणी घातलं.
जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. मुख्य मंदिर, पालखी आणि रथ फुलांनी सजवण्यात आला आहे. इंद्रायणी नदीच्या काठी वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच ठिकठिकाणी वैष्णवांचा मेळा भरला आहे. दोन वर्षानंतर पायी सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात रथाच्या पुढे धावण्याचा मान यंदा डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बलराज या अश्वाला मिळाला आहे. वारी करुन पालखी 9 जुलैला पंढरपुरात दाखल होणार असून 10 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होईल.