एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Rohit Pawar On Ajit Pawar : दादांविरोधात बारामतीमध्ये उमेदवारी मिळाल्यास लढणार?, रोहित पवार म्हणाले...

Rohit Pawar PC : पवार कुटुंबामधून कुणीही दादांविरोधात उभं राहणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. तसंच बारामतीत अजित पवारच जिंकणार, असा दावाही त्यांनी केला.

Rohit Pawar PC : अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरोधात बारामतीतून उभे राहणार का? असा सवाल विचारला असता पवार कुटुंबामधून कुणीही दादांविरोधात उभं राहणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिली आहे. तसंच बारामतीत (Baramati) अजित पवारच जिंकणार, असा दावाही रोहित पवार यांनी केला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

2024 च्या निवडणुकीत विधानसभेच्या 90 तर लोकसभेच्या 13 जागा अजित पवारांच्या गटाकडून लढवल्या जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या सगळ्या जागांमध्ये सगळ्यांच्या नजरा आहेत त्या बारामती मतदारसंघावर. बारमतीमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात जोरकस लढाई दिसेल, असं म्हटलं जात आहे. आता पुण्यातील पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाबाबत भाष्य केलं. 

'बारामतीमध्ये फक्त आणि फक्त अजित पवारच जिंकणार'

लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार असा सामना रंगणार का या प्रश्नावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, "नाही रंगणार. आणि विधानसभेचंही सांगतो. बारामती विधानसभेत फक्त आणि फक्त अजित दादा जिंकू शकतात, बाकी कोणीही जिंकू शकत नाही. राहिला प्रश्न लोकसभेचा तर बारामतीमधील जनता हुशार आहे."

दादांविरोधात उमेदवारी मिळाल्यास लढणार?, रोहित पवार म्हणाले...

बारामतीमधून तुम्हाला पक्षाकडून उमेदवारी दिली तर तुम्ही लढणार का, यावर रोहित पवार म्हणाले की, "मला उमेदवारी दिली तरी मी लढणार नाही. माझ्या कुटुंबातून कोणीही लढणार नाही. मी हेही सांगतो बारामतीमध्ये पवारसाहेबांच्या व्हिजनने आणि अजितदादांनी केलेल्या कामामुळे त्यांनाच तिथे मतदान होणार. अनेक लोक नाराज आहेत, बारामती नाराज आहे पण जेव्हा प्रश्न विधानसभेचा विषय येईल तेव्हा बारामतीमधून दादांचाच विजय होईल, असं माझ्यासारख्यांना सुद्धा विश्वास वाटतो." 

Rohit Pawar on Ajit Pawar : अजित पवारांनी केलेल्या कामांमुळे ते निवडून येतील : रोहित पवार

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कोण राखणार? 

एखाद्या कुटुंबात फूट पडली की वाटण्या होतात. घरापासून ते जमिनीच्या बांधापर्यंत प्रत्येक गोष्टीची वाटणी होते, अशीच गत आता पवार कुटुंबाचीही झाल्याचं दिसत आहे. पण इथे जमीन जुमल्याची वाटणी नाही इथे लढाई पक्षासाठी, लढाई पक्षाच्या चिन्हासाठी, लढाई अध्यक्षपदासाठी, लढाई राजकीय वारसासाठी आहे. पक्षात फूट पडली आणि कुटुंबही दुरावलं. कालपर्यंत एकमेकांसाठी एकजुटीने राजकारणाच्या मैदानात उतरणारी मंडळी आता एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. काका-पुतण्यामधील वारसाहक्काच्या वाटणीचा वाद काही नवा नाही. बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडून राज ठाकरेंनी नवा पक्ष स्थापन केला, गोपीनाथ मुंडेंची साथ सोडून धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं. अनेकदा वारसदाराच्या लढाईतूनच कुटुंब विभागल्याचं महाराष्ट्राने पाहिलं आहे आणि त्यात आता भर पडली आहे ती पवार कुटुंबाची. यानिमित्ताने पवार कुटुंबाचा वारसदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आंळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आंळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024Ramadas kadam Sai Darshan : रामदास कदम-धनंजय मुंडे शिर्डीत साईचरणी लीनChhagan Bhujbal On Devendra Fadnavis : भुजबळांची फडणवीसांसाठी बॅटिंग की चांगल्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग?ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 28 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आंळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आंळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
Muslim Bollywood Actors Hindu Screen Names : दिलीपकुमार ते मधुबालापर्यंत! या 11 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी मुस्लिम असूनही हिंदू नावे सहज स्वीकारली
दिलीपकुमार ते मधुबालापर्यंत! या 11 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी मुस्लिम असूनही हिंदू नावे सहज स्वीकारली
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
Embed widget