एक्स्प्लोर

Parth Pawar : अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार पुण्यातील अट्टल गुन्हेगाराच्या भेटीला; राजकीय वर्तुळात खळबळ

Parth Pawar : गजा मारणे कोथरूड परिसरात शास्त्रीनगर परिसरात आल्यानंतर गुन्हेगारीची मालिका सुरूच आहे. अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात गजा मारणेला अटक झाली. तो 3 वर्ष येरवडा कारागृहात होता.

पुणे : पुण्यात (Pune Crime) भुरट्या गुंडासह अट्टल गुंडगिरीचा कळस सुरु असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गजा मारणेची (Gaja Marne) पत्नी जयश्री मारणे राष्ट्रवादी काँग्रेसमधे आहे. दीड वर्षांपूर्वी जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश केला होता. यावेळी जयश्री मारणेंचा नवरा आणि कुख्यात गुंड गजानन मारणेनं पुष्पगुच्छ देऊन पार्थ पवार आणि इतर नेत्यांचे स्वागत केले.

भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ

जयश्री मारणे या मनसेकडून नगरसेविका राहिलेल्या आहेत. सध्या अजित पवार गटाकडून पुण्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पार्थ पवार, माजी नगरसेवक बंडू केमसे, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक दीपक मानकर हे कोथरूडमधे आले असता त्यांनी जयश्री मारणेंच्या घरी भेट दिली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

गजा मारणे कुख्यात गुंड, 3 वर्ष येरवडा कारागृहात

गजा मारणे कोथरूड परिसरात शास्त्रीनगर परिसरात आल्यानंतर गुन्हेगारीची मालिका सुरूच आहे. अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात गजा मारणेला अटक झाली. तो 3 वर्ष येरवडा कारागृहात होता. तो आता मारणे टोळीचा म्होरक्या आहे. या टोळीवर 23 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गजा मारणेवर सहापेक्षा अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी पुण्यातील व्यावसायिकाला 20 कोटी रुपयांची खंडणी मागणी केल्याप्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 

अजित पवारांकडून पुणे  पोलिसांना थेट कानपिचक्या

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी पुण्यातील गुंडगिरीवरून पोलिसांना कानपिचक्या दिल्या होत्या. कोण कुणाला गोळ्या घालतो, पण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हेगारांना पकडलं. ससूनमध्ये जे घडलं त्यात कुणाचाच मुलाहिजा बाळगणाऱ नाही, असं गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, कोणी कितीही मोठा असो, कितीही मोठ्या बापाचा असो त्याला सोडणार नाही. कुठे काही कानावर आलं आणि कोणी काही चुकलं तर देवेंद्रजी सस्पेंड करत नाहीत तर बडतर्फ करतात. 

पोलिसांचा वचक असला पाहिजे

त्यांनी सांगितले की, गुन्हेगारांचं उदात्तीकरण थांबलं पाहिजे, चित्रपटांचा परिणाम जाणवत आहे. पुष्पा नाम है मेरा, फुल नही फायर हुं, काय चाललंय? जेलमध्ये असलेल्या कैद्यांचे बाहेर वाढदिवस साजरे होतात. पोलिसांची इभ्रत राहिली पाहिजे. गुन्हेगारांचे होर्डिंग लागतात कसे? पोलिसिंगची पद्धत बदलली पाहिजे. पोलिसांचे गुन्हेगारीवर नियंत्रण राहिलं पाहिजे. पोलिस दलातील भरतीचे निकष बदलण्याची गरज आहे, उंचीची मर्यादा वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे ते म्हणाले.  पोलिसांच्या शरीरयष्टीवर लक्ष देण्याची गरज आहे, एक महिला पोलिस शरीराने अगदीच किरकोळ असल्याचं निदर्शनास आलं. चोराला कसं पकडणार असं तिला विचारलं तर ब्रेकिंग न्यूज झाली, असेही अजित पवार म्हणाले.  

इतर महत्वाच्या बातम्या 

 

महत्त्वाच्या बातम्या

अपुऱ्या कागदपत्रामुळं दस्त नोंदणी करण्यास नकार, रागातून थेट अधिकाऱ्यावरच हल्ला, पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना
अपुऱ्या कागदपत्रामुळं दस्त नोंदणी करण्यास नकार, रागातून थेट अधिकाऱ्यावरच हल्ला, पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना
संतापजनक! महाविद्यालयीन तरुणीवर सलग एक वर्ष चौघांकडून लैंगिक अत्याचार, पुण्यात धक्कादायक घटना, चार आरोपींना अटक 
संतापजनक! महाविद्यालयीन तरुणीवर सलग एक वर्ष चौघांकडून लैंगिक अत्याचार, पुण्यात धक्कादायक घटना, चार आरोपींना अटक 
Khalil Shaikh and Ravindra Dhangekar Case : खलील शेख प्रकरणी रवींद्र धंगेकरांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी पुढे ढकलली, कोर्टात नेमकं काय घडलं? अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरेंनी दिली माहिती
खलील शेख प्रकरणी रवींद्र धंगेकरांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी पुढे ढकलली, कोर्टात नेमकं काय घडलं? अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरेंनी दिली माहिती
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर

व्हिडीओ

NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget