Ajit Pawar: "....ही इच्छा पूर्ण व्हावी", अजितदादांसाठी पत्नी सुनेत्रा पवारांचं गणरायाकडं साकडं, मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळणार का?
Ajit Pawar: अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं, तुम्ही गणरायाकडं अजितदादा मुख्यमंत्री व्हावे म्हणून साकडं घातलं का? या प्रश्वावर उत्तर देताना सुनेत्रा पवार काय म्हणाल्या जाणून घ्या सविस्तर.
![Ajit Pawar: Ajit Pawar should become the Chief Minister or the wish of the workers should be fulfilled Sunetra Pawar Wish Ajit Pawar:](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/17/56bb33ac74b4f1cc7b44abe5dff06e9c17265511095401075_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे: आज सकाळी पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणरायाची पुजा केली. देवाकडे साकडं घातलं. राज्यासह पुण्यातील नागरिकांना शांततेत आणि आपली जबाबदारी पार पाडत विसर्जनात सहभागी होण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांच्यासोबत खासदास सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या देखील होत्या. यावेळी त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बाप्पाकडे काय मागितलं यावर उत्तर देताना सांगितलं की, आज अंनत चतुर्दशी आहे, आज सकाळी उत्साहपुर्ण वातावरात कार्यक्रम पार पडला. जनतेच्या सर्व इच्छा पुर्ण होऊ देत, राज्यातील नागरिकांना सुखी, समृध्दी, आणि भरभराटी लाभो, अशी प्रार्थना केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
राज्यातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, अजित पवारांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्री व्हावं, तुम्ही गणरायाकडं अजितदादा मुख्यमंत्री व्हावे म्हणून साकडं घातलं का? या प्रश्वावर उत्तर देताना खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) म्हणाल्या, सकाळी अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे, प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा असते, त्यांचा नेता मोठा व्हावा, आपल्या नेत्याला मोठं पद मिळावं, प्रत्येक कार्यकर्त्याला हे वाटतं, त्यात कार्यकर्त्यांचं अजित पवारांवर खूप प्रेम आहे, कार्यकर्त्यांच्या मनातील इच्छा पुर्ण होवो, असं साकडं मी गणरायाच्या चरणी साकडं घातलं आहे, असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.
प्रत्येक पक्षाला वाटतं असतं आपला पक्ष निवडणून आला पाहिजे, त्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत असतो. त्यामुळे मलाही वाटतं महायुतीचं सरकार येणार त्याचबरोबर ज्याचं संख्याबळ जास्त असेल त्या पक्षांचा मुख्यमंत्री असेल असंही यावेळी एबीपी माझाशी बोलताना सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री पदावर अजित पवारांची प्रतिक्रिया
निवडणुका तोंडावर आल्या आहेत, सरकारने अनेक योजना राज्यातील नागरिकांसाठी आणल्या आहेत, आता येत्या काळात तुम्ही मुख्यमंत्री व्हावं असं अनेकांना वाटतं, त्यावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar)म्हणाले, सर्वांनाच आपापले नेते मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं असतं. त्यावर दादांना वाटतं का? या प्रश्नावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, सर्वांना वाटतं म्हणजे त्यात दादा पण आले, त्यांच्या उत्तरावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
आपला मुख्यमंत्री व्हावा असं सर्व राजकीय पक्षांना वाटतं असतं, प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रकारचं मत असतं, पण सर्वांचीच इच्छा पुर्ण होते, अशातला भाग नाही. जागा एकच असते, त्याला तुम्हाला १४५चा आकडा पाहिजे, तर दुसरी गोष्टी मतदार राजाच्या हातात, कोणाला निवडणून द्यायचं. हे असल्यामुळं लोकशाही, संविधान, डॉ.बाबासाहेबांनी दिलेला मतदानाचा अधिकार, या बाबी महत्त्वाच्या आहेत. शेवटी सर्वांच्या बाबतीत चांगलं व्हावं, ही सर्वांचीच इच्छा असते. त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतात, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे.
पाहा व्हिडिओ: अजित पवारांसाठी सुनेत्रा पवारांचं देवाकडे साकडे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)