एक्स्प्लोर

पिंपरी चिंचवड गोळीबार प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होणार: पालकमंत्री अजित पवार

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. चौकशी अंती जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली

पुणे : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे कथित गोळीबार प्रकरणी दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल झालेत. कंत्राटदार अॅंथोनी यांचा मॅनेजर तानाजी पवारसह तिघांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने आमदार आणि त्यांच्या मुलाच्या दिशेने गोळीबार केल्याचा आरोप आहे. तर आमदारांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे आणि त्यांच्या पीएसह एकवीस जणांवर अपहरण आणि जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप तानाजी पवार यांनी केलाय. पण हा संपूर्ण घटनाक्रम आणि समोर येणाऱ्या बाबी पाहिल्या तर आमदारांचे काही दावे फोल ठरताना दिसतायेत.

घटना पहिली
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला. झाडलेल्या दोन्ही गोळ्यांमधून आमदार सुखरूप बचावले. घटनास्थळी वीस ते पंचवीस कार्यकर्ते उपस्थित होते, पैकी एक ही जखमी नाही. पालिकेचे कंत्राटदार सिजू अँथोनी यांचा मॅनेजर तानाजी पवारने गोळीबार केल्याची पोलिसांनी एबीपी माझाला माहिती दिली. मी स्वतः तानाजीला बोलावून घेतलं होतं, त्यानंतर त्याने एकेरी उल्लेख केला, त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला आणि त्याने माझ्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने मी यातून बचावलो असं आमदारांनी पोलिसांना माहिती दिली होती. तानाजी हे सीआरपीएफचे निवृत्त जवान असल्याचं ही समोर आलं. मग पत्रकार घटनास्थळी पोहचले आणि कॅमेऱ्यासमोर वरील घटनाक्रम सांगितला. राज्यातील सत्ताधारी आमदारांवर गोळीबार म्हणजे धक्कादायक घटना. याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी तातडीने तानाजी पवार यांना अटक केली. पण गोळी ना आमदारांना, ना उपस्थितांना लागली. मग गोळीची खूण शोधण्याचं काम सुरू झालं. पण काही केल्या पोलिसांना ती खूण सापडत नव्हती. 

घटना दुसरी
आमदार बनसोडे आणि तानाजी पवार यांच्यामधील 11 मे ला फोनवरून झालेल्या संवादाची क्लिप समोर आली. यात आमदार शिवीगाळ करून तानाजीला धमकावत आहेत. तानाजी मात्र आपण योग्य भाषा वापरावी असं अनेकदा सांगत होता. मात्र संतापलेल्या आमदारांनी तू उद्या ये मग बघू, असं त्यात धमकावले. एक मिनिट चाळीस सेकंदाची ही संपूर्ण क्लिप एबीपी माझाने प्रसारित केली असून आमच्या वेबवर त्या क्लिपमधील संपूर्ण संभाषण आम्ही टाकलेलं आहे.

घटना तिसरी
अॅंथोनी यांच्या आकुर्डी येथील कार्यालयासमोर 11 मेला घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही समोर आले. यात आमदार पुत्र सिद्धार्थ, त्यांचे पीए सह दहा जणांनी कार्यालयात प्रवेश केला. जमावबंदी कायदा लागू असताना गोंधळ घातला. तानाजी पवार कुठं आहे, ते सांगा असं उपस्थित कर्मचाऱ्यांना त्यांनी धमकावले. पण माहीत नाही, असं म्हणताच दोन कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर खेचण्यात आलं. तिथंच घातक शस्त्राने दोघांवर हल्ला झाला. हे सीसीटीव्ही दृश्यांनी समोर आणलं. या आधारावर आमदार पुत्र सिद्धार्थ, त्यांचे पीएसह दहा जणांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी निगडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला.

आमदार अण्णा बनसोडे आणि मुलगा सिद्धार्थच्या दिशेने गोळीबार झाला. तानाजी पवारसह तिघांनी हा कट रचल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये पहिल्या घटनेतील दावे करण्यात आले.

आमदार पुत्र, पीएवर गुन्हा दाखल
तानाजी पवार यांनी देखील पिंपरी पोलिसांनी दोन दिवसांत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दिली. यात वरील ऑडिओ क्लिपचा उल्लेख आहे. तर घटनेच्या दिवशी आमदारांच्या पीएसह दोघांनी माझं अपहरण केलं. तिथून घटना घडलेल्या ठिकाणी मला आणलं. तिथं आमदार स्वतः उपस्थित होते. ऑडिओ क्लिप मधील संवादात मी चुकीचं बोललो असेल तर मला माफ करा अशी मी माफी मागितली. तेंव्हाच आमदारांचा मुलगा सिद्धार्थने मला कार्यालयातून बाहेर आणलं. त्याच्या हातात घातक शस्त्र होतं, त्याने माझ्या डोक्यावर प्रहार केला. इतरांनी बेल्ट, लोखंडी रॉड, लाकडी दांडके, लथाबुक्क्यांनी मारहाण करत मला रक्तबंबाळ केलं. या मारहाणीत माझा जीव जाण्याची शक्यता होती. म्हणून माझ्याकडे असणाऱ्या बंदुकीतून एक हवेत गोळी झाडली. नंतर तीच बंदूक एकाने माझ्याकडून हिसकवली. नंतर मला एक गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यानंतर पोलीस आले आणि मला ताब्यात घेतलं. असा आरोप करत तानाजीने आमदार पुत्र आणि पीएसह एकवीस जणांवर अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.

वरील संपूर्ण घटनाक्रम आणि दाखल झालेले गुन्हे पाहता, आमदारांचे दावे फोल ठरत आहेत. एकतर आमदारांनी तानाजी पवारांना बोलावलं होतं की त्याचं अपहरण केलं होतं? तानाजीने हवेत गोळी झाडल्याच तक्रारीत म्हटल्याने आमदारांनी स्वतःवर गोळी झाडल्याचा केलेला दावा ही फोल ठरताना दिसतोय. आता दाखल गुन्ह्यांप्रमाणे तानाजी पवारांना अटक करण्यात आलीये. पण आमदार पुत्र, त्यांचे पीएसह इतरांना अटक होणार का? राज्यातील सत्तेचे आमदार भागीदार असल्याने पोलीस निःपक्षपातीपणे अटकेची कारवाई करणार का? हे पाहणं आता महत्वाचं राहील.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Embed widget