Ajit Pawar : पुण्याच्या विकासकामाला पंतप्रधान मोदी नेहमीच साथ देतात, अजित पवारांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक
PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अनेक विकास कामांचे लोकार्पण केले आहे.
Ajit Pawar : 'देशाच्या विकासाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नेतृत्व करतात' असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले आहे. तर पुण्याच्या विकासाला पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच सहकार्य करतात असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) विविध विकासकामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
पंतप्रधान देशाचे लोकप्रिय नेते : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशाचे लोकप्रिय नेते असा उल्लेख केला आहे. तर या कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदी हे विकास कामांसाठी पंतप्रधान नेहमी सहकार्य आणि प्रोत्साहन ते नेहमीच देत असतात असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. सर्वांच्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
'पंतप्रधान मोदींच्या मदतीचा फायदा महाराष्ट्राच्या जनतेला'
'पंतप्रधान मोदी हे राज्याच्या विकाससाठी कायम मदत करत असतात. त्याचा फायदा राज्यातील 14 कोटी जनतेला होत आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. "पंतप्रधान मोदींच्या मदतीचा फायदा महाराष्ट्राच्या जनतेला पंतप्रधान मोदी हे राज्याच्या विकासासाठी कायम मदत करत असतात. त्याचा फायदा राज्यातील 14 कोटी जनतेला होत आहे," असं अजित पवारांनी म्हटलं आहे. 'ही कामं सुरु असताना अनेक अडचणी आल्या आहेत, पण पुणेकरांनी कोणतंही राजकारण न आणता ही कामं पूर्णत्वाला नेण्यासाठी मदत केली आहे,' असं म्हणत अजित पवारांनी पुणेकरांचे आभार मानले आहेत.
या सर्व विकासकामांचे काम सुरु असताना पुणेकरांना आणि पिंपरी चिंचवडकरांना खूप त्रास सहन करावा लागला पण पुण्याच्या जनतेने हे सर्व सहन केलं, असं म्हणत अजित पवारांनी पुण्याच्या जनतेचे आभार मानले आहेत. पुढे बोलताना अजित पवारांनी म्हटलं की, मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस आणि मी महाराष्ट्राच्या विकासासाठी वेगाने काम करत आहोत. तसेच आमचं ट्रिपल इंजिनचं सरकार राज्याच्या जनतेच्या हितासाठी काम करत आहे.
'अनेकांनी पुण्याच्या विकासकामात मदत केली'
'जिजाऊंनी बालशिवाजीच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवून पुण्याच्या विकासाला सुरुवात केली. त्यानंतर अनेकांनी पुण्याच्या विकास कामांमध्ये अनेकांनी योगदान दिलं आहे. तर जनतेच्या हितासाठी, राज्यातील गरिबी हटवण्यासाठी सरकारकडून हा प्रयत्न करण्यात येत आहे.' पंतप्रधान आवास योजनेमधून मिळालेली घरं न विकण्याचा सल्ला यावेळी अजित पवार यांनी जनतेला दिला आहे. या कार्यक्रमादरम्यान नागरिकांना एक सुजाण नागरिक होण्याचं आवाहन देखील अजित पवार यांनी केलं आहे.