एक्स्प्लोर

आमच्यासाठी अजित पवारच मुख्यमंत्री : आमदार अण्णा बनसोडे

80 तासांचं सरकार स्थापन झाले तेव्हा अण्णा बनसोडे हे एकमेव आमदार अजित पवार यांच्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत होते.

पिंपरी चिंचवड : "अजित पवार हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री आहेत," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केलं आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार अवघ्या काही तासात होण्याची शक्यता असताना, त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. अण्णा बनसोडे हे पिंपरी चिंचवडचे आमदार आहेत. 80 तासांचं सरकार स्थापन झाले तेव्हा अण्णा बनसोडे हे एकमेव आमदार अजित पवार यांच्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत होते. त्या 80 तासात पवार कुटुंबीयांकडून काय शिकायला मिळालं असा प्रश्न विचारला असता त्यांनी याला बगल दिली. मात्र महाविकासआघाडीत अजित पवारांना मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा असताना तुम्हाला कोणतं पद मिळणार, याला उत्तर देताना अजित दादा हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सत्ता स्थापन केली. या शपथविधीवेळी अण्णा बनसोडे हे एकमेव आमदार शेवटपर्यंत अजित पवारांसोबत होते. हे सरकार केवळ 80 तासच टिकलं. अजित पवारांनी राजीनामा दिला आणि सरकार कोसळलं. यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि राष्ट्रवादीकडून अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार अशी चर्चा रंगू लागली. मात्र आता अण्णा बनसोडे यांनी अजित पवारच आमच्यासाठी मुख्यमंत्री आहे, असं वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. मंत्रीमंडळ विस्तार उद्या दुपारनंतर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 13 मंत्री शपथ घेतील. तर काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेतील, अशी माहिती मिळत आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे मोठे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबरला पार पडला होता. यामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर या सहा मंत्र्यांकडे हिवाळी अधिवेशनासाठी विविध खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मात्र या वर्षअखेर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये काँग्रेसच्या 7 ते 8 जणांची वर्णी लागू शकते.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Rain Update : पुण्याला पावसाने झोडपलं; बारामतीमध्ये विक्रमी पाऊस, एका रात्रीत रस्ते जलमय, नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर
पुण्याला पावसाने झोडपलं; बारामतीमध्ये विक्रमी पाऊस, एका रात्रीत रस्ते जलमय, नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर
Mugdha Deshmukh Death Case Pune: लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
उद्घाटनापूर्वीच पुण्यातील मान मेट्रो स्टेशनमध्ये साचलं पावसाचं पाणी, 3 नोव्हेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते होणार लोकार्पण, मेट्रोच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
उद्घाटनापूर्वीच पुण्यातील मान मेट्रो स्टेशनमध्ये साचलं पावसाचं पाणी, 3 नोव्हेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते होणार लोकार्पण, मेट्रोच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड नकोच, कर्जतमधील भाजपा नेत्याने पर्याय सूचवला; व्हिडिओ दाखवत सरकारकडे मागणी
टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड नकोच, कर्जतमधील भाजपा नेत्याने पर्याय सूचवला; व्हिडिओ दाखवत सरकारकडे मागणी

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Politics: राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
Gokul Election: गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
CPR Kolhapur: थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
Maharashtra Epstein Files Song: खरातला ओढलं, खेचत कोपऱ्यात नेलं...; महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील पहिलं गाणं समोर, VIDEO
खरातला ओढलं, खेचत कोपऱ्यात नेलं...; महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील पहिलं गाणं समोर, VIDEO
Mahalaxmi Express Robbery: सिग्नल यंत्रणाच बिघडवली अन् थेट महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूट; महिलांचे लाखोंचे दागिने हिसकावत दरोडेखोर लंपास, सातार्‍याजवळ मध्यरात्री थरार!
सिग्नल यंत्रणाच बिघडवली अन् थेट महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूट; महिलांचे लाखोंचे दागिने हिसकावत दरोडेखोर लंपास, सातार्‍याजवळ मध्यरात्री थरार!
Mugdha Deshmukh Death Case Pune: लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
Mumbai Crime News : दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
Bhuvneshwar Kumar Team India : 4 सामने, 1 विकेट, 11 हून अधिक धावा दिल्या; न्यूझीलंडसमोर भुवनेश्वर कुमार फ्लॉप, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून OUT?
4 सामने, 1 विकेट, 11 हून अधिक धावा दिल्या; न्यूझीलंडसमोर भुवनेश्वर कुमार फ्लॉप, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून OUT?
Embed widget