Ajit Pawar : काटेवाडीत जाताना अपघात पाहिला, अजितदादांनी गाडी थांबवली अन् थेट...; उपमुख्यमंत्र्यांनी जे केलं ते सगळेच पाहत राहिले!
अजित पवारांचा नवा चेहरा सगळ्यांना पाहायला मिळाला आहे. ताफा थांबवत अजितदादांची अपघातग्रस्ताला मदत केली आहे.
काटेवाडी, बारामती : अजित पवारांचा (AJit Pawar) वक्तशीरपणा, त्यांचा स्पष्टवक्तेपणा सगळ्या राज्याला सर्वश्रृत आहे. त्यातच त्यांच्या कामाची असलेली वेगळी पद्धतदेखील अनेकांनी अनुभवली आहे. मात्र आज अजित पवारांचा नवा चेहरा सगळ्यांना पाहायला मिळाला आहे. ताफा थांबवत अजितदादांची अपघातग्रस्ताला मदत केली आहे. आपल्या ताफ्यातील गाडीतून रुग्णाला रुग्णालयात पाठवलं आहे आणि महत्वाचं म्हणजे डॉक्टरांना उपचाराबाबत सुचनादेखील दिल्या आहे. अजित पवारांच्या या कृत्याने अजित पवारांनी अनेकांची मनं जिंकली आहेत.
नेमकं काय घडलं?
बारामतीहून काटेवाडीकडे जात असताना वाटेत झालेला अपघात पाहून क्षणात आपला ताफा थांबवून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जखमी झालेले जेष्ठ पत्रकार रामभाऊ तावरे यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी रुग्णालयात उपचाराच्याही सुचना दिल्या. याबाबत अधिक माहिती अशी, सोनगाव येथील आनंदराव देवकाते पत्नी संगीतासह आपल्या कारमधून बारामतीहून सोनगाव कडे निघाले होते. त्यावेळी रामभाऊ तावरे यांच्या दुचाकीची कारला धडक होऊन तावरे खाली पडले. त्यानंतर काही वेळातच तिथून कन्हेरीकडे जात असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपली गाडी थांबवण्याच्या चालकाला सूचना दिल्या. हे तर रामभाऊ, असं म्हणत तातडीने स्वत:च्या ताफ्यातील गाडीत तावरे यांना बसवले, सोबत काही लोक दिले आणि दवाखान्यात पाठवले. तावरे यांच्या पायाला किरकोळ जखम झाली आहे. मात्र अशातही क्षणाचा विलंब न लावता अजितदादांनी स्वतः पुढे होत दाखवलेली ही तत्परता सर्वांना भावली. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांना देखील रामभाऊ तावरे यांच्या उपचाराबाबत कळवले.
नंतर सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला!
अजित पवारांनी आज कन्हेरी मारोतीचं दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला आणि सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची सुरुवात केली. सून म्हणून सांगते मलाच मतदान करा, तुमचे सगळे ऋण फेडेल, अशी डरकाळी सुनेत्रा पवारांंनी फोडली तर अजित पवारांनी थेट सुप्रिया सुळे, शरद पवार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. पवार कुटुंबिय एकत्र फोटो काढून आपण एकत्र असल्याचं दाखवत आहे. ते भावनिक साद घालतील. त्या भावनेच्या भरात तुम्ही जाऊ नका, हा प्रश्न प्रपंच्याचा आहे, असं म्हणत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांसाठी मतदान करण्याचं आवाहन काटेवाडीकरांना केलं आहे.
हेही वाचा :
माजी मुख्यमंत्र्यांचा जावई अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाणार? ऐन निवडणुकीत काँग्रेसला जबर धक्का!
माढ्याचा तिढा सुटल्यानंतर उत्तम जानकरांना शरद पवारांचं पहिलं गिफ्ट; विधानसभेची उमेदवारी जाहीर
दागिने विकून गाय घेतली, आता मेहनतीच्या जोरावर झाली करोडपती; महिलेच्या जिद्दीला देशाचा सलाम!