एक्स्प्लोर

जनतेच्या पैशाची उधळपट्टी नको, 'झोपु'च्या नव्या कार्यालयावरुन अजित पवारांची नाराजी

पुण्यातील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या प्रतिमाह 12 लाख रुपये भाड्याच्या इमारतीवरुन अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पुण्यातील रचनात्मकदृष्ट्या चुकलेले पूल पाडून नवीन पूल बांधण्याचं सूतोवाचही त्यांनी केलं.

पुणे : पुण्यातील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन आज अजित पवारांनी केलं. या इमारतीचं दर महिन्याचं भाडं 12 लाख रुपये आहे. यावरुन अजित पवारांनी आपल्या भाषणात वारंवार नाराजी व्यक्त केली. यावेळी नगरविकास मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे या देखील उपस्थित होत्या.

'झोपु'चं हे कार्यालय जास्त काळ इथे राहू देणार नाही. हे कार्यालय सरकारी जागेत हलवावं. 12 लाख रुपये प्रति महिना भाडं मोजून हे कार्यालयं घेतलं हे बरोबर नाही. या कार्यालयासाठी वर्षाला दीड कोटी रुपये भाडं जाणार आहे. एवढ्या किमतीत एसआरएचं स्वतःचं कार्यालय तयार होईल. करदात्यांचा पैसा असा उधळण्याचं कारण नाही, असं अजित पवारांनी म्हटलं.

हे अलिशान कार्यालय काकडे बिझनेस सेंटरमधे सुरु करण्यात आलं आहे. हे बिझनेस सेंटर भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या मालकीचं आहे. एसआरएच्या या वातानुकूलित कार्यालयासाठी या बिझनेस सेंटरचा अख्खा पाचवा मजला भाड्याने घेण्यात आला आहे. खरं तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचं पुण्यात आधीच एक कार्यालय आहे, तरीही हे कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे अजित पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

रचनात्मकदृष्ट्या चुकलेले पूल पाडून नवीन पूल बांधण्याचं सूतोवाच 

पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण झाले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. पुण्यातील रचनात्मकदृष्ट्या चुकलेले पूल पाडून तिथे नवीन आणि मोठे पूल बांधण्याचा विचार असल्याचं सूतोवाच अजित पवार यांनी केलं आहे.

पुण्यातील उड्डाण पुलांची नव्याने रचना करणे गरजेचं आहे. नाहीतर वाहतूक कोंडीसाठी पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत, असं अजित पवार म्हणाले. पुण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठीही पुलांची पुनर्रचना गरजेची असल्याचं अजित पवारांनी म्हटलं. पुण्यातील रचानात्मकदृष्ट्या चुकलेल्या पुलांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समोरचा पूल, शिवाजीनगरचा कृषी महाविद्यालयाच्या समोरचा पूल, हडपसरचा गाडी तळ भागातील पूल, शिवाजीनगरचा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरचा पूल, पुणे-सातारा रस्त्यांवरील कात्रज-धनकवडी भागातील पूल या पुलांचा समावेश आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lonavala Politics : नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारीचं नवरा-बायकोचं नातं, लोणावळा नगराध्यक्ष 'हे' काय बोलून बसले!
नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारीचं नवरा-बायकोचं नातं, लोणावळा नगराध्यक्ष 'हे' काय बोलून बसले!
Pune Crime: लोणावळ्यात कार चालकांना लुटण्याचा नवा फंडा, बनावट कर्ज वसुलीचा बहाणा करून फसवणुकीचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
लोणावळ्यात कार चालकांना लुटण्याचा नवा फंडा, बनावट कर्ज वसुलीचा बहाणा करून फसवणुकीचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; राष्ट्रवादीच्या खासदाराने दिली माहिती, कोणाला मिळणार लाभ?
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; राष्ट्रवादीच्या खासदाराने दिली माहिती, कोणाला मिळणार लाभ?
Pune Dog Attack :पुण्याच्या खेडमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस; कुत्र्यांच्या टोळीनं एका कुत्र्याचा घेतला जीव, थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कैद!
पुण्याच्या खेडमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस; कुत्र्यांच्या टोळीनं एका कुत्र्याचा घेतला जीव, थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कैद!

व्हिडीओ

Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं
Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय
Shweta Mahale vs Sanjay Gaikwad :संजय गायकवाड म्हणाले, कुणाची माय व्याxxx, श्वेता महालेंचं उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rinku Singh: शाहरुख खानच्या लाडक्या रिंकू सिंगचं प्रमोशन, कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल सुरु होण्यापूर्वी मोठा निर्णय
रिंकू सिंगचं प्रमोशन, कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल सुरु होण्यापूर्वी मोठा निर्णय, कोणती जबाबदारी मिळाली?
Air India : 19 मार्चला कॅनडाला जाणारं विमान चीनमधून परत फिरवण्याची वेळ,  8 तासात विमान पुन्हा दिल्लीत पोहोचलं, एअर इंडियावर नामुष्की का आली?
कॅनडाला जाणारं विमान चीनमधून परत फिरवण्याची वेळ, एअर इंडियावर नामुष्की कोणत्या कारणामुळं आली?
मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलणं गरजेच; विधानपरिषदेतील निवृत्तीच्या भाषणावरुन निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर जोरदार टीका
मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलणं गरजेच; विधानपरिषदेतील निवृत्तीच्या भाषणावरुन निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर जोरदार टीका
Ashok Kharat Property : नाशिक, अहिल्यानगर, पुणे अन् पनवेलमध्ये संपत्ती, भोंदू अशोक खरातच्या 40 कोटींच्या संपत्तीचा तपशील हाती, देवेंद्र फडणवीस यांची माहिती
भोंदू अशोक खरातची 40 कोटींची संपत्ती समोर, खरातची जमीन कोणत्या शहरात, देवेंद्र फडणवीस यांनी सर्व तपशील मांडला
अजित दादांच्या घराबाहेर काळी जादू, अनेक नेत्यांनी करंगळीही कापली; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, कोणाचं नाव घेतलं?
अजित दादांच्या घराबाहेर काळी जादू, अनेक नेत्यांनी करंगळीही कापली; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, कोणाचं नाव घेतलं?
... म्हणून रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार; अशोक खरातप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन
... म्हणून रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार; अशोक खरातप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन
Uddhav Thackeray : अजितदादांचं स्मरण, मविआ सरकारचा लेखा जोखा सादर, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीन मागण्या, उद्धव ठाकरे शेवटच्या भाषणात काय म्हणाले?
अजितदादांचं स्मरण, आजी माजी सहकाऱ्यांचे आभार, उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेतील शेवटच्या भाषणात काय म्हटलं?
अशोकचं तोंड काळ्या कापडानं झाकलं, कोर्टाबाहेर मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तृप्ती देसाईंचाही ठिय्या, फोटो
अशोकचं तोंड काळ्या कापडानं झाकलं, कोर्टाबाहेर मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तृप्ती देसाईंचाही ठिय्या, फोटो
Embed widget