Vaishnavi Hagawane Death: वैष्णवीच्या मृत्यूनंतर बाळाची हेळसांड; निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल, 21 मे पासून फरार, पोलिसांच्या पथकांकडून तपास सुरू
Vaishnavi Hagawane Death: निलेश चव्हाणला शोधण्यासाठी बावधन पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची पथके रवाना झाली आहेत.

पुणे: वैष्णवी हगवणेच्या (Vaishnavi Hagawane Death) आत्महत्येनंतर तिच्या 9 महिन्याच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी बंदूकधारी निलेश चव्हाणवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलिसांकडून निलेश चव्हाणचा शोध सुरु आहे. 21 मे पासून निलेश चव्हाण फरार असल्याची माहिती आहे. वैष्णवी हगवणेच्या (Vaishnavi Hagawane Death) बाळाची हेळसांड केल्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलीसांकडून या प्रकरणात निलेश चव्हाणला अटक करण्याच्या हालचाली सुरु आहेत. निलेश चव्हाणला शोधण्यासाठी बावधन पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची पथके रवाना झाली आहेत.(Vaishnavi Hagawane Death)
लॅपटॉप केला जप्त
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माहिती देताना सांगितलं की, निलेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल आहे. ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी पंचनामे करत छापेमारी केली आहे. लॅपटॉप जप्त केला आहे. त्याच्या वडीलांना आणि भावाला चौकशीसाठी बोलावलं आहे. जे-जे लोक त्या दिवशी प्रत्यक्षदर्शी होते, ज्या दिवशी कस्पटे यांना धमकी दिली. त्या सर्वांना चौकशीसाठी बोलवू असंही संभाजी कदम यांनी म्हटलं आहे. तर त्याला कायदाप्रमाणे नोटीस दिली आहे. त्याच्या भावाला नोटीस दिली आहे. चौकशीसाठी सहकार्य नाही केलं किंवा आला नाही तर कायदेशीर कारवाई करू अशी नोटीस दिल्याची माहिती आहे.
9 महिन्यांचे बाळ करिष्मा हगवणेने निलेशच्या ताब्यात दिले
निलेश चव्हाणवर या आधी पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात वैष्णवी हगवणेच्या माहेरच्यांना धमकावल्याचा गुन्हा दाखल आहे. वैष्णवीचे बाळ आणण्यासाठी गेलेल्या वैष्णवीच्या माहेरच्या लोकांना निलेश चव्हाणने 20 मे रोजी बंदुकीचा धाक दाखवून धमकावले होते. 16 मे लाख वैष्णवी आत्महत्या केल्यानंतर तीचे 9 महिन्यांचे बाळ तीची नणंद करिष्मा हगवणेने निलेशच्या ताब्यात दिले होते. कस्पटेंनी 21 मे रोजी हे बाळ स्वतःकडे घेण्याचा पुन्हा प्रयत्न केला होता. तेव्हा निलेश चव्हाणणे हे बाळ पिरंगुट गावातील एका व्यक्तीकडे सोपवले होते. त्यानंतर दुपारी हे बाळ पुण -मुंबई महामार्गावर मोहन कस्पटेंकडे सोपवण्यात आले होते. यामुळे नऊ महिन्यांच्या बाळाची प्रचंड हेळसांड झाली होती. कस्पटे कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर निलेश चव्हाणच्या विरोधात याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आलाय आहे.
हगवणेंच्या गुन्ह्यांमध्ये साथ देणारा निलेश चव्हाणचीही पार्श्वभूमीही गुन्हेगारी प्रवृ़त्तीचा आहे. हगवणे कुटुंबीय जसा आपल्या सुनांचा छळ करायचे, तसंच निलेश चव्हाणही आपल्या बायकोचा अतोनात छळ करायचा, निलेशची कुंडलीच एबीपी माझाच्या हाती लागलीय. त्यात निलेश किती विकृत्त प्रवृत्तीचाही आहे हे स्पष्ट झालंय. बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावून स्वत:च्याच बायकोचे आक्षेपार्ह व्हिडिओ निलेश बनवायचा. 3 जून 2028 ला निलेश चव्हाणचं लग्न झालं, जानेवारी 2019 निलेशच्या पत्नीला बेडरूममध्ये पंख्याला लटकलेली संशयास्पद वस्तू दिसली. विचारणा केली असता निलेशची उडवाउडवीची उत्तरं दिलं. फेब्रुवारी 2019 बेडरूमच्या एअर कंडिशनरमध्येही काही संशयास्पद वस्तू, त्यावरही उडवाउडवीची उत्तरं दिली. निलेशच्या लॅपटॉपमध्ये पत्नीला दोघांचे एकांतातले व्हिडीओ आढळले,स्पाय कॅमेऱ्याने चित्रण केल्याचं तिला समजलं.
निलेशच्या लॅपटॉपमध्ये इतरही मुलींसोबतचे त्याचे आक्षेपार्ह व्हिडीओ त्याच्या पत्नीने पाहिलं. पत्नीने जाब विचारला असता निलेशने चाकूने धमकावलं, आणि तिचा गळा दाबला. पत्नीने सासू सासऱ्यांना माहिती दिली त्यावेळी त्यांच्याकडून तिचाच छळ करण्यात आलं. अखेर छळाला कंटाळून निलेशच्या पत्नीने घर सोडलं, 14 जून 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला होता.

























