एक्स्प्लोर

मोठी बातमी : यापुढे इमर्जन्सी रुग्णांकडून डिपॉझिट घेणार नाही, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला उपरती!

Deenanath Mangeshkar Hospital: रुग्णालयाचे ट्रस्टी धनंजय केळकर यांनी पत्रक जारी करत इथून पुढे दीनानाथ रुग्णालयात इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंट कडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे.

पुणे: पुण्यात भाजप आमदाराचे स्वीय सहाय्यक असलेले सुशांत भिसे यांच्या सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांना वेळीच उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला आहे. त्यानंतर आता रुग्णालयाचे ट्रस्टी धनंजय केळकर यांनी पत्रक जारी करत इथून पुढे दीनानाथ रुग्णालयात इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंट कडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे.

आम्ही इथून पुढे दीनानाथ रुग्णालयात इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंट कडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही. रुग्णालयाचे ट्रस्टी धनंजय केळकर यांनी पत्रक जारी करत माहिती दिली आहे. दुर्दैवी घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाची मान शरमेने खाली गेली.
दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या नावाला काळेफा असल्यामुळे आमची मान शर्मिला खाली गेली. सगळं पाहून लता मंगेशकर यांना मानणारे लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देव जाणे, असे परिपत्रक म्हटले आहे.

पत्रात नेमकं काय म्हंटलंय? 

कालचा दिवस दिनाच्या इतिहासातील अत्यंत काळा आणि सुन्न करणारा...

आजपर्यंत केलेल्या कामाची जाणीव न ठेवता ोर्चेकर्‍यांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या अंगावर चिल्लर फेकली..

काही महिला कार्यकर्त्यांनी डॉक्टर घैसास यांच्या हॉस्पिटलची तोडफोड केली..

काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तर लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाला काळे फासले..

हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली..

हे पाहून लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देव जाणे..

या सर्व गोष्टींनी निराश होऊन विश्वस्त मंडळांची काल बैठक झाली..

लोक कशा पद्धतीने चुकीचे वागत आहे किंवा या घटनेला राजकीय रंग कसा येत चालला हे सोडून आम्ही आत्मचिंतन केले..

झालेल्या दुर्दैवी घटनेमागे दिनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणे चुकीचे चालले.. तरीसुद्धा आम्ही रुग्णालयाकडून संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे तपासात आहोत..

सदर महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः जमेल तेवढी रक्कम भरा असे सांगितले..मात्र तरीसुद्धा ते कोणालाही न करता निघून गेले..

दीलनाथ रुग्णालय सुरू झालं तेव्हा पुन्हा तेही रूपातील अनामक रक्कम घेतली जात नसेल...

मात्र रुग्णालयाचे नाव वाढत गेले आणि गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेल्यामुळे अनामत रक्कम देण्यास सुरुवात झाली..

कालच्या घटनेने आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला..

इथून पुढे दिनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून मग तो इमर्जन्सी रूममधून आलेला असतो पण डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलेला असो 
लहान मुलांच्या विभागाला आलेला असो त्याच्याकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही..

असा ठराव विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी केला असून त्याची अंमलबजावणी आजपासून होईल..

झालेल्या घटनेतील सत्य शासकीय चौकशी बाहेर येईलच परंतु या निमित्ताने या असवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत.

ट्रस्टींचं पत्र जसच्या तसं

माझ्या प्रिय बंधू व भगिनींनो,

2001 साली दीनानाथ रुग्णालयाची सुरुवात झाली. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रेरणेने व आदर्शवादाच्या उद्देशाने हे रुग्णालय सुरू झाले. हे रुग्णालय इतरांपेक्षा वेगळे आहे कारण यामध्ये सचोटी, कमिशन प्रॅक्टिसला अजिबात थारा न देणे, फार्मा इंडस्ट्री कडून कोणतेही पैसे व स्पॉन्सरशिप न घेणे, पेशंट कडून नियंत्रित दरामध्ये व शिस्तीमध्येच सर्व व्यवहार करणे, जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणे, पारदर्शकता व आलेल्या सर्व गरीब व गरजू रुग्णांची मदत करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर सतत जागती ठेवून वाटचाल करण्यात आली. दिवसेंदिवस दीनानाथ रुग्णालयाची प्रगती वाढतच गेली व आजमितिला ८५००० आंतररुग्ण दरवर्षी, पाच लाख बाह्य रुग्ण आणि तीस हजार मोठ्या शस्त्रक्रिया रुग्णालय रुग्णांच्या विश्वासावरच करीत आहे. यामध्ये गरीब रुग्णांना रोज दहा रुपयांमध्ये कुठल्याही विभागाचा केस पेपर, रोज ५० टक्के सवलतीत सर्व तपासण्या व दारिद्य रेषेखालील रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया या केल्या जातात आणि त्याची दर महिन्याला charity कमिशनरला पूर्ण यादी पुरवली जाते. स्वाईन फ्लू कोविड व आताच होऊन गेलेला जीबीएस वा गियाबारी सिंड्रोम या सर्व साधींच्या आजारात रुग्णालयाने अतिशय निस्पृहपणे विलक्षण काम केले.

कालचा दिवस दीनानाथ च्या इतिहासातील अत्यंत काळा व सुन्न करणारा होता. आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता, रागावलेल्या मोर्चातील एका समूहाने पब्लिक रिलेशन ऑफिसर्सच्या अंगावर चिल्लर फेकली, महिला कार्यकर्त्यांनी जाऊन डॉक्टर घैसास यांच्या आई वडिलांच्या हॉस्पिटलवर हल्ला केला व तोडफोड केली, एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर या नावाला काळे फासले व या सर्व गोष्टी जबाबदारपणे टेलिव्हिजन कॅमेऱ्यासमोरच घडल्या. हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली व लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देवच जाणे.
हेचि काय फळ मम तपाला, इथपासून ते या समाजात चांगले काम करूच नये अशा प्रकारचे सर्व विचार व सल्ले मिळू लागले. या सर्व गोष्टींनी उद्विग्न होऊन विश्वस्त मंडळाची काल छोटी बैठक झाली व त्यात या विषयावर सखोल चर्चा झाली. लोकं कशा पद्धतीने चुकीचे वागत आहेत किंवा या विषयाला राजकीय रंग कसा येत चालला आहे हे सोडून देऊन, आपले काय चुकत आहे यावर आत्मचिंतन करण्यात आले.

हा सर्व विचार करीत असताना एक शब्द आमच्या सर्वांच्या मनात काळोख्या रात्रीतल्या विजेसारखा चमकून गेला -'असंवेदनशीलता' अर्थात व्यवहाराच्या चौकटीमध्ये आदर्शवादाचा किंवा संवेदनशीलतेचा कोंडमारा.
झालेल्या दुर्दैवी घटनेमागे व मृत्यू मागे दीनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणे जरी चुकीचे चालले असले तरी रुग्णालयाकडून रुग्णाप्रति संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे आम्ही तपासत आहोत. सदर महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः त्यांना तुम्हाला जमेल तेवढी रक्कम भरा बाकी आम्ही सर्व मदत करू असे सांगितलेले असतानाही कोणालाही न कळवता ते निघून गेले.

जेव्हा दीनानाथ सुरू झाले तेव्हा कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम (डिपॉझिट) घेतली जात नसे परंतु जसे जसे उपचार व शस्त्रक्रिया व रुग्णालयाचे नाव वाढत गेल्यामुळे येणारे गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले तसे तसे जास्त महागडे उपचार गरजेचे असल्यास अनामत रक्कम घेण्यास कुठेतरी सुरुवात झाली. कालच्या उद्विग्न करणाऱ्या घटनेने आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला व यापुढे दिनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून मग तो इमर्जन्सी रूम मध्ये आलेला असो वा डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलो असो वा लहान मुलांच्या विभागाला आलेला असो त्यांच्याकडून इमर्जन्सी मध्ये अनामत रक्कम घेणार नाही असा विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केला व आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. झालेल्या घटनेतील सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईलच परंतु ह्या निमित्ताने या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत याची सर्व बंधू-भगिनींनी व माननीय मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी.

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation Election: काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद; चंद्र आणि सूर्य सोडून सर्वच आश्वासन सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांना दिली; खासदार धनंजय महाडिकांची टीका
काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद; चंद्र आणि सूर्य सोडून सर्वच आश्वासन सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांना दिली; खासदार धनंजय महाडिकांची टीका
पोलिसांनी विवस्त्र करुन मारहाण केली, भाजप महिला कार्यकर्तीचा आरोप; व्हिडिओवर आयुक्तांकडून स्पष्टीकरण
पोलिसांनी विवस्त्र करुन मारहाण केली, भाजप महिला कार्यकर्तीचा आरोप; व्हिडिओवर आयुक्तांकडून स्पष्टीकरण
Sangli Municipal Corporation Election: बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल

व्हिडीओ

Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..
Rohit Pawar MCA Vastav 261 : रेवती सुळे, कुंती रोहित पवार यांच्या समावेशाचा वाद पेटला;न्यायालयाचा चाप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation Election: काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद; चंद्र आणि सूर्य सोडून सर्वच आश्वासन सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांना दिली; खासदार धनंजय महाडिकांची टीका
काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद; चंद्र आणि सूर्य सोडून सर्वच आश्वासन सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांना दिली; खासदार धनंजय महाडिकांची टीका
पोलिसांनी विवस्त्र करुन मारहाण केली, भाजप महिला कार्यकर्तीचा आरोप; व्हिडिओवर आयुक्तांकडून स्पष्टीकरण
पोलिसांनी विवस्त्र करुन मारहाण केली, भाजप महिला कार्यकर्तीचा आरोप; व्हिडिओवर आयुक्तांकडून स्पष्टीकरण
Sangli Municipal Corporation Election: बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
Mumbai Metro: कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
Sanjay Raut on BJP: भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
PMC Election 2026: पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
Embed widget