Pune Accident News: स्वामींच्या दर्शनाला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; कारला कंटेनरची धडक, तिघांना फरफटत नेलं तर एकाचा..,पुण्यातील घटना
Accident News: देवदर्शनासाठी जात असताना कंटेनरने तीन जणांना चिरडत चारचाकी गाडीला जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
Pune Accident News: पुण्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या मित्रांवर काळाने घाला घातला आहे. देवदर्शनासाठी जात असताना कंटेनरने तीन जणांना चिरडत चारचाकी गाडीला जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. अपघातात (Pune Accident News) एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे.
दुरुस्तीसाठी थांबलेल्या स्विफ्ट कारला कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. ही दुर्दैवी अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रोहित पोकळे असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात बुधवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास झाला आहे. दौंड तालुक्यातील वाखरी या गावात झाला आहे. पुण्यातील (Pune Accident News) 4 मित्र अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघाले होते. वाखरी जवळ त्यांची गाडी गरम झाल्याने त्यांनी गाडी बाजूला उभी केली. गाडीतून सर्व जण खाली उतरले आणि बाजूला थांबले होते.
यावेळी त्यातील एका मित्राने पुण्याकडून सोलापूरला जात असलेला एक भरधाव कंटेनर (एम एच 42 बी एफ1666) त्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहिले आणि त्याने उडी मारली. मात्र इतर मित्रांना या कंटेनरने जोरदार धडक दिली. यातील एका तरुणाला तर कंटेनरने फरफटत नेलं. पुढे जाऊन हा कंटेनर जेव्हा थांबला तेव्हा चालक प्रदीप माने हा दारू पिऊन वाहन चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
देवदर्शनासाठी जात असताना कंटेनरने तीन जणांना चिरडत चारचाकी गाडीला जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. pic.twitter.com/ppCGpDdpY6
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) August 23, 2024
घटनेचा व्हिडिओ व्हायरल
या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मिडीयावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, एक कार रस्त्याच्या कडेला उभी आहे, त्याचवेळी एक कंटेनर वेगात येतो आणि क्षणार्धात त्या कारसह तिघांना फरफटत नेतो, त्याचवेळी त्यातील एक जण बाजूला उडी मारतो त्यामुळे वाचतो.