एक्स्प्लोर
पिंपरी : शाळांमध्ये लालबत्ती खेळाची दहशत!
पिंपरी चिंचवडच्या सरस्वती इंग्लिश मीडियम हायस्कूलमधील असाच एक प्रकार पोलिसांपर्यंत पोहचला आहे.
पिंपरी चिंचवड : तुमचा पाल्य शाळेत जाऊन लालबत्ती खेळ खेळत असेल तर त्याला तातडीने आळा घाला. कारण या खेळात मुलांकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली जाते. पिंपरी चिंचवडच्या सरस्वती इंग्लिश मीडियम हायस्कूलमधील असाच एक प्रकार पोलिसांपर्यंत पोहचला आहे.
सध्या अनेक शाळांमध्ये लालबत्ती नावाचा खेळ प्रसिद्ध झाला आहे. एका मुलाला टार्गेट करुन त्याच्या तोंडावर कोट अथवा कपडा टाकला जातो आणि मग लाथा बुक्क्यांनी मारामारी सुरु होते. पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडीत असाच प्रकार झाला.
सरस्वती इंग्लिश हायस्कूलच्या नववीत शिकणाऱ्या राहुल पासवानला 10 ते 12 मित्रांनी मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. राहुल सारख्या इतर काही विद्यार्थ्यांनाही या खेळाचा फटका बसला आहे.
खेळातील हे गंभीर प्रकरण पोलिसांपर्यत गेलं. पोलिसांनी विद्यार्थ्यांना आणि शाळेला समज देऊन प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड पसिरातील अनेक शाळांध्ये लालबत्तीचा खेळ सुरु आहे. पण आता हा जीवावर बेतणारा खेळ रोखण्यासाठी शाळा आणि पालकांनी पुढाकार घेतला आहे.
अलीकडच्या काळात मुलं व्हर्च्युअल विश्वात दंग झाली आहेत. मोबाईल आणि इंटरनेटमुळे खेळाच्या मैदानावर मुलं क्वचितच दिसतात. त्यामुळे शाळांना मैदानी खेळांना नक्कीच प्राधान्य देण्याची गरज आहे. पण ते करताना लालबत्ती सारख्या जीवावर बेतणाऱ्या खेळापासून विद्यार्थ्यांना दूरच ठेवणं आवश्यक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement