Pune Crime News : बुधवार पेठेतील सराईत वाहन चोरटा अखेर जेरबंद ; तरुणाकडून तब्बल 16 वाहनं जप्त
पुण्यातील बुधवार पेठेतून वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात फरासखाना पोलीस स्टेशनच्या पोलिसांना यश आलं आहे. सोहेल युनुस शेख असं 26 वर्षीय अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
Pune Crime News : पुण्यातील (Pune) बुधवार पेठेतून वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात फरासखाना पोलीस (Pune Crime) स्टेशनच्या पोलिसांना यश आलं आहे.रोज गाडी चोरी गेल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे पोलिसांनी याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सोहेल युनुस शेख असं 26 वर्षीय अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून 4,40,000 किंमतीच्या 16 वाहनंं जप्त करण्यात आले आहे.
16 मोटारसायकली जप्त
पुण्यातील बुधवार पेठेत हजारोच्या संख्येने नागरिक येत असतात. गेल्या सहा महिन्यांपासून देहू रोड परिसरात राहणारा एक युवक रोज या परिसरात यायचा आणि या परिसरात उभ्या असलेल्या दुचाकी चोरून नेत होता. फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या सहा महिन्यापासून वाहन चोरीचे प्रमाण वाढले होते. वाहन चोरी रोखणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. या वाहन चोरीला आळा घालण्यासाठी फरासखाना पोलिसांकडून या दुचाकी चोरी झालेल्या भागातील सी.सी.टी.व्ही कॅमेरे पाहून आरोपीचा शोध घेण्यात सुरुवात झाली आणि पोलिसांनी एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल अडीचशेहून अधिक सीसीटीव्ही पाहून या दुचाकी चोरणाऱ्या सराईताकडून तब्बल 16 वाहनं जप्त केले आहे.
150 ते 200 सी.सी.टी.व्ही कॅमेरे केले चेक
आरोपी सोहेल शेख हा पुण्यातील बुधवार पेठेत येत होता. परिसरात लावण्यात आलेल्या दुचाकी चोरी करायचा. गेल्या सहा महिन्यात फरासखाना परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने पोलिसांची देखील डोकेदुखी वाढली होती. अशातच पोलिसांकडून बुधवार पेठ परिसरातील सीसीटीव्ही तपास सुरू फरासखाना पोलीस स्टेशनचे अंमलदार वैभव स्वामी आणि प्रविण पासलकर यांनी मोटारसायकल चोरी झालेल्या ठिकाणापासून ते देहूरोडपर्यंत दुचाकी मोटारसायकलचा शासकीय आणि खासगी असं आठ दिवसांचे तब्बल 150 ते 200 सी.सी.टी.व्ही कॅमेरे चेक केले. यात निगडीच्या भक्तीशक्ती चौकापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले. मात्र त्यानंतर आरोपी कुठे फरार व्हायचा यासंदर्भात कोणतीही माहिती मिळत नव्हती.
शेवट पोलिसांनी परिसरात पेट्रोलिंग करत असताना एक व्यक्ती दुचाकी घेऊन जाताना दिसला. त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली. या चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र पोलिसांनी तपास सुरु ठेवला आणि त्याला बेड्या घातल्या. या सोहेलवर आतापर्यंत 17 गुन्हे दाखल आहेत. त्याता फसारखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती परिमंडळ 1 च्या पोलीस उपआयुक्त डॉ.प्रियांका नारनवरे यांनी दिली आहे.