Pune Crime News: विकृतीचा कळस! उपचारासाठी आलेल्या 19 वर्षीय तरुणीवर चक्क डॉक्टरांनीच केला अत्याचार
डॉक्टरजातीला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या एका 19 वर्षीय तरुणीवर डॉक्टरनेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Pune Crime News: डॉक्टरजातीला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या एका 19 वर्षीय तरुणीवर डॉक्टरनेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या डॉक्टरने पीडित तरुणीचे मोबाईलमध्ये नग्न अवस्थेतील फोटो काढले आणि याविषयी कुणाला काही सांगितल्यास सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
19 वर्षीय तरुणी डॉक्टरांकडे उपचारासाठी आली होती. यावेळी डॉक्टरांनी तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. अत्याचार करताना त्या तरुणीचे नग्नावस्थेत फोटो काढून घेतले. घडलेल्या प्रकारासंदर्भात कुटुंबीयांना अथवा कोणाला माहिती दिल्यास फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. मात्र तरुणीने धमकीला न जुमानता कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार कुटुंबीयांनी कोथरुड पोलिसांकडे तक्रार दाखल केली. 45 वर्षीय डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे.
सध्या शहरात अत्याचाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. फोटो मॉर्फिंग आणि सोशल मीडियाची भीती दाखवून प्रकरणं दाबण्याचा प्रयत्न केला जातो.त्यामुळे या संदर्भातील अनेक प्रकरणं पुढे येत नाही. मात्र या अत्याचाराचं प्रमाण रोखण्याची गरज आहे. जोपर्यंत या नराधमांना शिक्षा होत नाही तोपर्यंत असे गुन्हे थांबणार नाही.
पहिल्या लग्नाची माहिती लपवून 28 वर्षीय तरुणीवर लग्नाचं आमिष दाखवून केला अत्याचार
पहिला विवाह झाला असताना 28 वर्षीय तरुणीला विवाहाचं अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसराती पोलीस ठाण्यात या प्रकरणाबाबत 28 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली होती. यावरुन आरोपीला अटक करण्यात आली होती. जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. तरुणी पुण्याची रहिवासी असून आरोपी हा मध्यप्रदेशचा रहिवासी आहे.