एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'वैष्णव जन तो'...पुण्यात 69 व्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवास सुरुवात

परंपरेनुसार तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सुरुवात झाली. त्यांनी राग मधुवंतीने सुरवात केली आणि 'वैष्णव जन तो' या भजनाच्या वादनाने त्यांनी सांगता केली.

Sawai Gandharva Mahotsav Pune 2023 : पुण्यातील संगीतप्रेमी यांची अखेर प्रतीक्षा संपली आहे. पुणेकरांचा (Sawai Gandharva Mahotsav Pune 2023)  आणि त्यातच संगीतप्रेमींचा सगळ्यात आवडत्या महोत्सवाची आजपासून सुरुवात झाली आहे. परंपरेनुसार तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सुरुवात झाली. त्यांनी राग मधुवंतीने सुरुवात केली आणि 'वैष्णव जन तो' या भजनाच्या वादनाने त्यांनी सांगता केली.

यानंतर किराणा घराण्याचे गायक संजय गरूड यांनी गायनाची सुरुवात राग भीमपलास मधील 'अब तो बडी देर' या रचनेतून केली.  त्याला जोडून द्रुत त्रितालात 'बीरज मे धूम मचाए शाम' ही प्रसिद्ध बंदिश त्यांनी रंगवली. 'माझे माहेर पंढरी' या प्रसिद्ध अभंगाने त्यांनी भक्तिरसपूर्ण भाव निर्माण केले. 'सवाई' च्या स्वरमंचावर सुविख्यात गायक पं. कुमार गंधर्व यांना जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकली यांनी आपल्या बहारदार सादरीकरणातून कुमारजींच्या समृद्ध आणि प्रयोगशील गायन वारशाचे दर्शन घडवले.

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव मागील 69 वर्षांपासून आयोजित करण्यात येतो. अनेक वर्ष दिग्गज कलाकारांनी हा मंच गाजवला आहे.  यावर्षी 13 ते 17 डिसेंबर 2023 दरम्यान हा दैदीप्यमान सोहळा संपन्न होणार आहे.  मुकुंदनगरमधील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुलात हा महोत्सव होत आहे.

पीएमपीकडून जादा गाड्यांची सुविधा

शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अग्रमानांकित असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी पीएमपीकडून जादा गाड्यांची सुविधा देण्यात आली आहे. ही विशेष सुविधा बुधवार(13 डिसेंबर) ते रविवार (17 डिसेंबर) या कालावधीत असणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच अन्य शहरातूनही असंख्य रसिक महोत्सवासाठी उपस्थित रहात असतात. सवाई गंधर्व  संगीत महोत्सव संपल्यानंतर परतीच्या सोयीसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी 25 टक्के जादा दराने तिकिट आकारणी करण्यात येणार आहे.

मुकुंदनगर ते निगडी, मुकुंदनगर ते धायरी, मुकुंदनगर ते कोथरूड डेपो, मुकुंदनगर ते वारजे माळवाडी या मार्गांवर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. या सर्व गाड्या रात्री साडेदहा वाजता सुटणार असून शनिवारी (16 डिसेंबर) रात्री साडेदहा आणि रात्री साडेबारा वाजताही जादा गाड्यांची सुविधा असणार आहे. मुकुंदनगर ते निगडीसाठी प्रती प्रवासी 40 रुपये, मुकुंदनगर ते धायरीसाठी प्रती प्रवासी 25 रुपये, मुकुंदनगर ते कोथरूड डेपोसाठी प्रती प्रवासी 20 रुपये आणि मुकुंदनगर ते वारजे माळवाडीसाठी प्रती प्रवासी 25 रुपये अशी तिकिट आकारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमपीच्या वाहतूक व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

कोणत्या दिवशी कोणते दिग्गज लावणार उपस्थिती ?

13 डिसेंबर 2023। दुपारी ३ वाजता
तुकाराम दैठणकर आणि सहकारी - सनई
संजय गरूड - गायन
कलापिनी कोमकली - गायन
पं. तेजेंद्र नारायण मजुमदार - सरोद पं. उल्हास कशाळकर - गायन
भीमसेन महोत्सव

14 डिसेंबर 2023| दुपारी 4 वाजता
अंकिता जोशी - गायन
पं. उपेंद्र भट - गायन
पार्था बोस - सतार
विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे - गायन

15 डिसेंबर २०२३ | दुपारी 4 वाजता
रजत कुलकर्णी - गायन
श्रीमती पद्मा देशपांडे - गायन
नीलाद्री कुमार - सतार
पं. अजय पोहनकर आणि अभिजित पोहनकर - गायन

16 डिसेंबर 2023| दुपारी 4 वाजता
प्राजक्ता मराठे - गायन
देबप्रिय अधिकारी व समन्वय सरकार - गायन आणि सतार श्रीमती यामिनी रेड्डी - कुचीपुडी
अभय सोपोरी - संतूर
बेगम परवीन सुलताना - गायन

17 डिसेंबर 2023 | दुपारी 12 वाजता
श्रीनिवास जोशी - गायन श्रीमती पौर्णिमा धुमाळे - गायन
पं. सुहास व्यास - गायन
ऐश्वर्या वेंकटरामन आणि सहकारी - कर्नाटक शास्त्रीय संगीत कौशिकी चक्रवर्ती - गायन
पं. रोणू मजुमदार - बासरी
डॉ. प्रभा अत्रे - गायन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  3 डिसेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar Delhi : अजित पवारांच्या दिल्लीवारीमुळे भुवया उंचावल्याMarkadwadi Protest : व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचं मत भाजपकडे वळत असल्याचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Embed widget