एक्स्प्लोर
पुण्यात 16 वर्षीय युवतीवर 40 वर्षीय व्यक्तीचा कटरने हल्ला

पुणे : 16 वर्षांच्या युवतीवर 40 वर्षीय व्यक्तीने कटरने वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. सुदैवाने या हल्ल्यातून तरुणी बचावली असून तिला किरकोळ जखमा झाल्या आहेत. 17 ऑक्टोबरला आरोपी प्रभू मरडीने तरुणीची छेड काढली होती. त्यावेळी तिने आरोपीला चांगलाच चोप दिला. छेडछाडीचा हा प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाला होता. याचाच राग आरोपीच्या मनात खदखदत होता. त्यानंतर 19 तारखेला म्हणजेच बुधवारी या आरोपीने पुन्हा तरुणीला गाठलं आणि तिच्यावर कटरने वार केले. गुरुवारी संध्याकाळी आरोपीला पोलिसांनी अटक केली.
आणखी वाचा























