एक्स्प्लोर
जुन्नरमध्ये अन्नातून विषबाधा, एकाच कुटुंबातील 3 मुलांचा मृत्यू

पुणे : अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण अत्यवस्थ असून त्यांच्यावर नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. जुन्नरमध्ये ही दुर्देवी घटना घडली.
राहुल बाळासो फुलमाळी (वय 8 वर्ष), साईराज बाळासो फुलमाळी (वय 6 वर्ष) आणि धनराज बाळासो फुलमाळी (वय 4 वर्ष) अशी मृत मुलांची नावं आहे.
तर गौरी बाळासो फुलमाळी (वय 13 वर्ष), पूजा बाळासो फुलमाळी आणि आई सिंधु बाळासो फुलमाळी यांच्यावर अहमदनगरमधील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
सोमवारी रात्री ही घटना घडली. मिठाई आणि घरातील अन्न खाल्ल्यानंतर काल रात्री 8:30 वाजता उलट्या होऊ लागल्या. नंतर दोन रुग्णालयात उपचार घेतले तरी ही उलट्या थांबत नसल्याने तिसऱ्या रुग्णालयात उपचार घेताना दोघांचा मृत्यू झाला तर तिसऱ्या मुलाचा ससून रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला.
विषबाधेचे नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, या प्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
पुणे
सोलापूर
Advertisement
Advertisement
























