MPSC Exam postponed again LIVE Updates | परीक्षेसाठी वयाची मर्यादा आडवी येणार नाही, मुख्यमंत्र्यांची परीक्षार्थींना ग्वाही
रविवार, 14 मार्च 2020 रोजी होणारी एमपीएससीची राज्य सेवा परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलीय.. राज्य सरकारच्या मदत आणि पुनर्वसन विभागाच्या कोरोना निर्बंधविषयक शिफारशींनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, पुण्यात आज परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत आंदोलन छेडलं..

Background
राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी 14 मार्च रोजी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.
राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याववर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं आयोगाने म्हटलं आहे. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली.
पुण्यातील नवी पेठ परिसरातील एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लोकसेवा आयोगाच्या या निर्णयाचा रस्त्यावर उतरुन विरोध केला. पोलिसांना त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षभरात कोरोनाची कारणे सांगून परीक्षा रद्द केल्या जात आहेत, मात्र गर्दी जमवण्यास कारणीभूत असलेले अन्य कार्यक्रम मात्र व्यवस्थित सुरु असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता एमपीएसची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य : विनायक मेटे
एमपीएससीची परीक्षा 14 मार्चऐवजी 21 मार्च रोजी होण्याची शक्यता : सूत्र
एमपीएससीची परीक्षा 14 मार्चऐवजी 21 मार्च रोजी होण्याची शक्यता असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी फेसबुक लाईव्हवरुन संवाद साधण्याची शक्यता आहे.























