"विरोध झाला पाहिजे, मात्र देशाचं मनोबल तोडणारा विरोध नको", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा
कोरोना काळात नागरिकांचे मनौधैर्य वाढवणाऱ्या उपक्रमाची चेष्टा करण्यात आली, संकटाच्या काळात तरी विरोधकांनी राजकारण करू नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
नवी दिल्ली : राष्ट्रपतींचं अभिभाषण मार्ग दाखवणारं ठरलं आहे. संपूर्ण विश्व संकटांचा सामना करत आहे. कोरोना संकटाचा कुणी विचारही केला नसेल अशा काळात आपण कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. "दिवा लावण्याच्या उपक्रमाची अनेकांनी खिल्ली उडवली आहे. विरोध जरूर करावा त्यासाठी अनेक मुद्दे आहे. मात्र देशाचं मनोबल तोडणार विरोध नको", असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, 21 वं शतक भारतासाठी प्रेरणादायी आहे. सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहिम भारतात राबवली जात आहे. भारतानं अनेक देशात कोरोना लस पाठवली आहे. संपूर्ण जगाला याचा अभिमान वाटतो. यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम केले आहे. कोरोना काळात नागरिकांचे मनौधैर्य वाढवणाऱ्या उपक्रमाची चेष्टा करण्यात आली, अशा संकटाच्या काळात तरी विरोधकांनी राजकारण करू नये.
काँग्रेस देशाला नेहमी निराश करते. भारताची लोकशाही स्वार्थी आणि आक्रमक नाही. भारतात विदेशातून विक्रमी गुंतवणूक होत आहे. गरिबीमुक्त भारतासाठी प्रयत्नशील आहे. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक जगानं पाहिलं. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढली असून लहान भूधारक शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत नाही'. निवडणुका आल्यावर कर्जमाफीचा मुद्दा येतो. कृषी मंत्र्यांनी केलेल्या प्रश्नाला कुणी उत्तर देत नाही. शेतकरी आंदोलनाच्या प्रश्नावर सर्वांचं मौन आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कायद्याच्या मूळ मुद्द्यांवर चर्चा करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :