एक्स्प्लोर

Prakash Solanke : बीडचे ते चार-पाच पुढारी कोण? धनंजय मुडेंनी नाव घेऊन बोलावं; प्रकाश सोळंके थेटचं बोलले, सगळंच काढलं!

धनंजय मुंडे जिल्ह्यातील काही पुढाऱ्यांमुळे बदनामी झाली असं म्हणतात. तर ते बीडचे चार-पाच पुढारी कोण? याबाबत धनंजय मुंडे यांनी नाव घेऊन बोलायला पाहिजे. असे म्हणत आमदार प्रकाश सोळंके यांना तोफ डागली आहे.

Prakash Solanke : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) जिल्ह्यातील काही पुढाऱ्यांमुळे बदनामी झाली असं म्हणतात. तर ते बीडचे (Beed) चार-पाच पुढारी कोण? याबाबत धनंजय मुंडे यांनी नाव घेऊन बोलायला पाहिजे. ते जर संतोष देशमुख (Santosh Deshmukh) प्रकरणाबाबत बोलत असतील तर ते विधानसभेत जाहीरपणाने मांडणं म्हणजे बदनामी नाही. हे हत्याकांड कुणी घडून आणलं, त्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळायला पाहिजे, ही आमची मागणी होती. आरोपी पकडले गेलेत. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या खंडणीसाठी केली गेली. खंडणी मागणीची ताकद कोणाची होती? खंडणी कोण मागत होता? याबाबतही स्पष्टीकरण द्यावे. असे म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बीडच्या माजलगाव मतदार संघातील आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांना धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली आहे.

Prakash Solanke :  जी बदनामी झाली ती बदनामी नाही, तर जिल्ह्याची वस्तुस्थिती

कुणीही जातीवर कुणाला बदनाम केलेले नाही, समाज म्हणून आम्ही कधी टीका केली नाही. तर आरोपीवर टीका केलेली आहे. तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्याचा कारभार ज्याप्रकारे हाकला. संपूर्ण अधिकार वाल्मीक कराड यांना देऊन टाकले. त्याची परिणीती त्या खुनात झाली. वाळूचे उत्खनन, राखीचे विक्री, असे अवैध धंदे राजरोसपणे सुरू होते. हे काढलं म्हणजे बदनामी नाही. वाळूवर आमचे टिप्पर चालत होते का राखेवर आमचे ट्रक चालत होते? जी बदनामी झाली ती बदनामी नाही, तर जिल्ह्याची वस्तुस्थिती होती. आम्ही रस्त्यावर उतरल्यामुळे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक झाली असेही आमदार प्रकाश सोळंके म्हणाले.

Prakash Solanke on Pankaja Munde : पंकजा मुंडे जाहीर पणाने सांगणार नाहीत, पण...

माझ्या मतदारसंघात रमेश आडसकर यांची उमेदवारी धनंजय मुंडे यांच्यामुळे, तर माधव निर्मळ यांची उमेदवारी पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांच्यामुळे आली. या प्रवेशामुळे माझ्या आरोपाची पुष्टी मिळत आहे. कारण आडसकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर निर्मळ यांनी भाजप प्रवेश केला. पंकजा मुंडे जाहीर पणाने सांगणार नाहीत, पण त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी निर्मळ यांचे काम केलं. काही लोकांनी आडसकरांचं काम केलं, याबाबत मी वरिष्ठ पातळीवर बोललो आहे. पंकजा मुंडे यांनी युतीबाबत सांगितलेली वस्तुस्थिती आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी हे प्रमुख पक्ष राहिलेले आहेत. असेही प्रकाश सोळंके म्हणाले.

Prakash Solanke on Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला असेल तर....

नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी अजित दादांना सोबत घेतलं आहे. त्यामुळे युती झालेली आहे. आता ती कुणाला आवडू नको, युतीच्या बाबतीत निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. प्रीतम मुंडे यांच्यावर नवीन जबाबदारी देणारच्या घोषणेचे मी स्वागत करतो. युती झाली तर आम्ही सोबत काम करू, युती नाही झाली तर प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल. समाजामधील दरी मिटाव्यात, असे पंकजा मुंडे म्हणाल्या यावर बोलताना त्यांनी जर जरांगे यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला असेल तर ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी जरांगे पाटलाबाबत या विषयावर चर्चा करून समाजामधील दूही कशी मिटवण्यात येईल हे पहावे. या कामासाठी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत असेही प्रकाश सोळंके म्हणाले.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Ibrahim Khan On Kareena Kapoor Koffee With Karan 9: 'बेबो, तू कुलेस्ट सावत्र आई आहेस...'; सैफच्या पहिल्या बायकोचा मुलगा करिना कपूरबद्दल भरभरुन बोलला, VIDEO
'बेबो, तू कुलेस्ट सावत्र आई आहेस...'; सैफच्या पहिल्या बायकोचा मुलगा करिना कपूरबद्दल भरभरुन बोलला, VIDEO
Gokul President Election 2026: गोकुळवर 5 शासननियुक्त संचालकांची नियुक्ती योग्य की अयोग्य?; अँड. श्रीकृष्ण गणबावले यांची चक्रावणारी माहिती
गोकुळवर 5 शासननियुक्त संचालकांची नियुक्ती योग्य की अयोग्य?; अँड. श्रीकृष्ण गणबावले यांची चक्रावणारी माहिती
Sunetra Pawar: पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
Maharashtra Live News Updates: 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालकांवरून वादंग सुरूच
Maharashtra Live News Updates: 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालकांवरून वादंग सुरूच

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
Sunetra Pawar: पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
Embed widget