Maharashtra Politics: मनसे- भाजप महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवणार? महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट, काय आहेत शक्यता?
Maharashtra Politics: मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे मनसे ला सोबत घेणार. भाजपकडून टाळीसाठी पुढे आलेल्या हातावर मनसे टाळी देणार का? बघूया महायुतीत मनसेची एंट्री चा खास रिपोर्ट
मुंबई: राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसे पक्षाला सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला निश्चितच रस आणि आनंद आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर त्यांच्या अभिनंदनाचे आणि विधायक उपक्रमांना पाठिंबा असल्याचे ट्विट केले होते. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी मनसेबाबत सकारात्मक आणि आशादायक वक्तव्य केले आहे. देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी 'सह्याद्री' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.त्यानंतर आता भाजप आणि मनसे सोबत येणार का याबाबतच्या अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर आता भाजप मनसे एकत्रित येणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. भाजपने हात पुढे केल्यास मनसे देखील सोबत येण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजप मनसे एकत्र येण्यासंदर्भात मनसे देखील सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे, भाजपकडून याबाबतचा प्रस्ताव आल्यास निश्चित विचार होईल अशी माहिती समोर येत आहे.
भाजपकडून टाळीसाठी पुढे आलेल्या हातावर मनसे टाळी देणार का? बघूया महायुतीत मनसेची एंट्री चा खास रिपोर्ट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की लोकसभेला आम्हाला मनसेमुळे फायदा झाला, विधानसभेला इतक्या मोठ्या प्रवाहाच्या विरोधात मनसे लढली, महापालिकेच्या निवडणुकीत जिथे सोबत असेल तिथे आम्ही त्यांना सोबत घेऊ. यामुळं आता भाजपकडून मनसेचा महायुतीत येण्याचा निर्णय झाला आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं
याआधी ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीचे किस्से पाह्याला मिळाले आहेत. देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांना अनेकदा भेटण्यासाठी शिवतीर्थावर आले असताना गॅलरीत त्यांच्या गप्पा रंगलेल्या पाह्यला मिळालेल्या आहेत. माझा पक्ष हा महायुतीबाहेरचा पक्ष आहे, पण मी कंम्फर्ट झोन कुठे पाहतो तर भाजपसोबत, असं विधान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलं होतं, तर राज ठाकरे आमचे मित्र आहेत आणि जेव्हापासून त्यांनी हिंदुत्व स्विकारले आहे तेव्हापासून ते आयडॉलॉजिकली आमच्यासोबत आले आहे असे मत देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीच्या काळात मांडलं होते.
मनसेच्या नेत्यांचं देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या मुद्द्यावर मत काय? हे जाणून घेण्यासाठी मनसेच्या नेत्यांशी संवाद साधला आहे त्यांनी म्हंटल या वक्तव्याचं स्वागत आहे, आमची महायुती च्या विरोधात भूमिका नव्हती आम्ही सदैव एकला चलो चा नारा दिला आहे… आता निवडणुका संपल्या आहेत त्यामुळं पुढे त्यावर चर्चा आणि विश्लेषण करुन पुढची भूमिका घेऊ. असं मनसे नेते अविनाश अभयंकर, यांनी म्हटलं आहे.
- मनसेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता
- त्यावेळीच चर्चा रंगल्या होत्या की मनसे महायुती सोबत आहे… भाजपकडून मनसेला परिषदेची जागेची ऑफर दिली गेली होती या ही चर्चा होत्या
- आता पालिका निवडणुकांसाठी भाजप सोबत एकत्र येण्याबाबत मनसेही सकारात्मक असल्याची माहिती
- भाजपने टाळी दिल्यास मनसेही टाळी देण्यास तयार असल्याची माहिती मिळत आहे…
- याच कारण म्हणजे याआधी झालेल्या बैठकीतही मनसेच्या नेत्यांनी भाजप सोबत राहून निडणुक लढवण्याची भुमिका राज ठाकरेंसमोर मांडली होती…
मनसे भाजपच्या एक येण्याच्या चर्चांवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. राज ठाकरे हे भाजपच्या हातातील खेळणे आहे. राज ठाकरेंना भाजप खेळवत ठेवतात असं राऊत म्हणालेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला आणि मनसेच्या एंट्रीला हिरवा कंदील दाखविला आहे त्यांनी म्हंटल आहे राज साहेबांचा विचार आहे महाराष्ट्राला पुढे न्यायचा. त्यांच्या आणि आमचे अनेक गोष्टी जुळतात, एकत्र येतात. त्यांनी मोदी यांच्या निवडणुकीत पूर्ण सहकार्य केलं होतं. ते आमच्या विचारांशी सहमत आहे, आम्ही त्यांच्या विचारांशी सहमत आहोत. आमचे विचार बऱ्यापैकी सारखे आहेत.महाराष्ट्राने या आधी ही ठाकरे भाजप युती पाहिली आहे, त्या युतीचा फायदा निवडणुकीत ही झाला आहे. आगामी काळात मनसे भाजप महा युती एकत्र आले तर त्याचा फायदा च होईल अशी चिन्ह आहेत.