एक्स्प्लोर

Sharad Pawar and Ajit Pawar: अजित पवारांच्या 'त्या' कृतीने राष्ट्रवादी एकत्र येण्याचा डाव फिस्कटला, शरद पवारांनी सगळेच दोर कापून टाकले

Sharad Pawar & Ajit Pawar: भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेऊ शकत नाही, शरद पवारांच्या वक्तव्याने अजितदादा गटासोबतच्या युतीच्या चर्चेला ब्रेक लागला.

NCP Sharad Pawar camp and Ajit Pawar Camp: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चेचे जोर धरला होता. दोन्ही बाजूंनी मनोमीलनासाठी वातावरणनिर्मिती झाली होती. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असे दिसत असतानाच शरद पवार यांनी मंगळवारी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत हातमिळवणी करण्याची शक्यता फेटाळून लावली होती. भाजप आणि भाजपसोबत जाणाऱ्या संधीसाधू लोकांसोबत आपल्याला जायचे नाही, असा स्पष्ट संदेश शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला होता. शरद पवारांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते. एकीकडे शरद पवार यांनीच राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा निर्णय पुढच्या पिढीच्या हातात सोपवला होता. मग शरद पवार यांनी काल अचानक अजित पवार आणि भाजपसोबत जायचे नाही, अशी स्पष्ट भूमिका का घेतली, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यासाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भातील घडामोडींमुळे शरद पवारांनी अजितदादांसोबत हातमिळवणी न करण्याचा निर्णय घेतला, असे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील खासदार हे भाजपसोबत जावे, या मताचे आहेत. तर शरद पवार गटातील खासदारांना अजित पवार यांच्यासोबत जायचे आहे. खासदार आणि आमदारांनी तसा प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर मांडला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र करण्याच्या हालचालींना वेग आला होता. परंतु, शरद पवारांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवडमधील कार्यक्रमात अचानक युतीच्या चर्चांना ब्रेक लावणारे वक्तव्य केले होते. 

त्यामुळे शरद पवार गटाकडून सुरु असलेली मनोमीलनाची तयारीही बंद झाली होती. यासाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल उभे करण्यासंदर्भात अजित पवार यांनी सूतोवाच केले होते. त्यादृष्टीने अजितदादा गटाकडून सर्वांशी बोलणी सुरु होती. शरद पवार गटाने या निवडणुकीत सहा जागांची मागणी केली होती. अजित पवार चार जागा सोडायला तयारही झाले होते. ही सर्व बोलणी अंतिम टप्प्यात असताना उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी परस्पर आपले निळकंठेश्वर हे पॅनल जाहीर करुन टाकले होते. यामध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांचा समावेश नव्हता. त्यामुळे शरद पवारांनी तातडीने नवी मोट बांधत युगेंद्र पवारांच्या नेतृत्त्वाखाली बळीराजा पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.

Sharad Pawar NCP: अजित पवारांची कोणती गोष्ट काकांना खटकली?

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बळीराजा पॅनल उतरवल्यानंतर शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांची एक बैठक झाली होती. यावेळी अजित पवारांनी परस्पर घोषणा केलेल्या पॅनलबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना अजित पवारांनी परस्पर आपले स्वतंत्र पॅनल जाहीर केले. अजित पवार आतापासूनच शरद पवारांसोबत असणाऱ्या लोकांना अशी वागणूक देत असतील तर भविष्यात ते काय करतील, याबाबत सिल्व्हर ओकवरील बैठकीत चर्चा झाली. या बैठकीअंती शरद पवार यांनी अजित पवार आणि भाजप यापैकी कोणासोबतच जायचे नाही, असा निर्णय घेतला.

आणखी वाचा

भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेऊ शकत नाही, शरद पवारांच्या वक्तव्याने अजितदादा गटासोबतच्या युतीच्या चर्चेला ब्रेक

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Embed widget