Andheri East Bypoll: भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार का घेतली? जाणून घ्या काय आहे कारण
Andheri East Bypoll: महाराष्ट्राच्या राजकारणात तीन पोटनिवडणूकांनंतर भाजपने ही निवडणुक बिनविरोध करायचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Andheri East Bypoll: महाराष्ट्राच्या राजकारणात तीन पोटनिवडणूकांनंतर भाजपने ही निवडणुक बिनविरोध करायचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या निवडणुकीसंदर्भात पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या आहेत. पण भाजपने नेमकी माघार घेण्याची काय-काय करणे आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.
भाजपची माघार, लटकेंचा जयजयकार …
अंधेरी पुर्व निवडणुकीत मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यानंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर दुसरीकडे मुरजी पटेलांच्या कार्यकर्त्यांनी निराशा व्यक्त केली आहे. भाजप कार्यकर्ते नाराज झाले आणि सर्वांना एकच प्रश्न पडला तो म्हणजे, भाजपनं असं का केलं?
अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीत ठाकरे आणि भाजपमध्ये टक्कर होत असताना शरद पवार आणि राज ठाकरेंनी उडी घेतली आणि बिनविरोध ही निवडणुक व्हावी अशी विनंती केली. हिच मागणी सर्वीकडून जोर धरू लागली. या मागणीनंतर 24 तासांतच भाजपनं आपला उमेदवार मागे घेतला.
भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार का घेतली ?
- रमेश लटकेंच्या निधनानंतर त्यांची पत्नीच निवडणूक मैदानात उतरल्यानं सहानुभूतीची लाट.
- ऋतुजा लटकेंचा बीएमसी सेवेतील राजीनामा नामंजूर करणे, हायकोर्टात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणे, यामुळं ऋतुजा लटकेंच्या सहानभुतीत वाढ.
- अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची व्होट बँक मजबूत आहे. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसही शिवसेनेच्या पाठीशी राहिल्याने इथं महाविकास आघाडीची ताकद आणखी वाढली.
- मुंबई महापालिका तोंडावर असताना या निवडणुकीत पराभव झाल्यास भाजपला अडचणीचे ठरले असते.
- भाजप उमेदवार मुरजी पटेल यांचे नगरसेवक अपात्रता प्रकरणात निवडणूक न लढवण्याच्या मुद्द्यावरून सेना कोर्टात जाण्याच्या तयारीत होती.
- येत्या काळात भाजपच्या मतदारसंघात पोटनिवडणूक लागल्यास महाविकास आघाडी एकत्र लढल्यास भाजपला अडचणीचे ठरले असते.
- झाकली मूठ सव्वा लाखाची ´ राहू द्या, ही भूमिका भाजपची राहिली.
- या मतदारसंघात शिंदे गटाची ताकद फारशी नसल्यानं राज्यात सत्ता असतानाही पराभव झाल्यास सरकारची नामुष्की ठरली असती.
दरम्यन, कोल्हापूर, देगलूर आणि पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढाई झाली होती. पण या लढाईत माघार घेतल्या उलटसुलट चर्चां सुरु झाल्या आहेत. त्यात अवघ्या काही महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी सर्व पक्ष तयारीत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंतचं सर्वात मोठं बंड झालं आहे. त्यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत निकाल उलटेसुलटे जर लागले, तर आगामी काळातले महाराष्ट्राचे समीकरण बदलू शकतं. तसेच कधी कोणावर काय वेळ येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे बिनविरोध निवडणुक करण्याचं स्वागत केलं जातंय.