Vice Presidential Election 2022: कोण असेल विरोधी पक्षांचा उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार? तीन दिवसात होणार स्पष्ट
Vice Presidential Election 2022: केंद्रीय निवडणूक आयोगाने (CEC) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या क्रमवारीत येत्या दोन-तीन दिवसांत विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल.
Vice Presidential Election 2022: केंद्रीय निवडणूक आयोगाने (CEC) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या क्रमवारीत येत्या दोन-तीन दिवसांत विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल. यात उपराष्ट्रपतीपदाचा संयुक्त उमेदवार निश्चित होऊ शकतो. याबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 6 ऑगस्ट रोजी होणार आहे. 12 किंवा 13 जुलै रोजी देशाच्या राजधानीत विरोधी पक्षांची बैठक होणार असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके), राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), समाजवादी पक्ष (एसपी) आणि काही इतरांसह अनेक विरोधी पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अद्याप कोणाचेही नाव समोर आले नसले तरी विरोधी पक्षांचे नेते देशातील दुसऱ्या सर्वोच्च घटनात्मक पदासाठी संयुक्त उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) देखील या पदासाठी कोणतेही नाव पुढे केलेले नाही. नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, नामांकनाची अंतिम तारीख 19 जुलै आहे. 22 जुलैपर्यंत उमेदवारांना त्यांची नावे मागे घेता येतील. निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाची तारीख 6 ऑगस्ट निश्चित केली असून याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कोण लढवू शकतो?
भारताचा कोणताही नागरिक ज्याचे वय 35 वर्षे पूर्ण आहे तो ही निवडणूक लढवू शकतो. यासोबतच राज्यसभा निवडणुकीची पात्रता असलेले उमेदवार असावेत. उपराष्ट्रपतीची निवडणूक लढवणारा उमेदवार हा राज्याचा किंवा केंद्रशासित प्रदेशाचा मतदार असला पाहिजे. जर उमेदवार संसदेच्या सभागृहाचा किंवा राज्य विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य असेल, तर निवडणूक जिंकल्यानंतर त्याला त्याचे सदस्यत्व सोडावे लागेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Amarnath Yatra : अमरनाथजवळ सांगलीतील 47 जणांचा ग्रुप अडकला, यात्रा आजही स्थगित; रेस्क्यू ऑपरेशन सुरु
- Johannesburg Shooting : दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा रक्ताळली, बारमध्ये घुसून झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 14 मृत्यूमुखी, 10 जखमी