एक्स्प्लोर

Pune Crime Jalindar Supekar: जालिंदर सुपेकरांनी 500 कोटी मागितल्याचा आरोप, सावकार नानासाहेब आणि गणेश गायकवाड कोण?

Pune Crime Jalindar Supekar: नानासाहेब गायकवाड अन् गणेश गायकवाड या बाप-लेकांनी त्यांच्या वकिलांमार्फत जालिंदर सुपेकर यांनी त्यांना 550 कोटी रुपये मागितल्याची तक्रार न्यायालयात केली होती.

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मुळशीतील हगवणे कुटुंबीयांचे नातेवाईक असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेंद्र सुपेकर यांच्याबाबत अनेक खळबळजनक आरोप समोर येत आहेत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणापूर्वी जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक (कारागृह) (Special IG Prisons) या पदावर कार्यरत होते. या काळात त्यांनी अमरावती कारागृत बंदिस्त कारागृहात असणाऱ्या एका कैद्याकडून 550 कोटी रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कैद्याने आपल्या वकिलांमार्फत न्यायालयात तशी तक्रार केली आहे. या प्रकरणामध्ये पुण्यातील सावकार नानासाहेब आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड यांचं नाव समोर आलं असून ते सूनेचा छळ केल्याच्या आरोपावरुन गेली काही वर्षे तुरुंगात आहेत‌. या बाप-लेकांनी त्यांच्या वकिलांमार्फत जालिंदर सुपेकर यांनी त्यांना 550 कोटी रुपये मागितल्याची तक्रार न्यायालयात केली होती.

नेमकं काय आहे प्रकरण?

गणेश गायकवाडचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेनेत गेलेल्या दिपक साळुंखे यांच्या मुलीसोबत 2017 मध्ये लग्न झालं होतं. मात्र, हुंड्यासाठी तीचा छळ होत होता. पेटवलेल्या सिगारेटचे चटके देऊन तीला मारहाण केली जात होती, अशी तक्रार 2021 मध्ये पोलीसांकडे करण्यात आली होती. त्यानंतर गायकवाड बाप लेकांना अटक झाली होती. नाना गायकवाडच्या सावकारी विरुध्द अनेक जणांनी तक्रारी केल्याने त्याच्यावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र, येरवडा कारागृहात बंदिस्त असताना त्याच्यावर इतर कैद्यांकडून हल्ला करण्यात आला. त्यामुळे त्यांना आणि गणेशला अमरावती कारागृहात हलवण्यात आले‌ होते. गायकवाडच्या वकीलाने केलेल्या दाव्यानुसार जालिंदर सुपेकर तुरुंग उपमहानिरिक्षक असताना 19 ऑगस्ट 2023 ला अमरावती कारागृहात आले होते आणि तिथे त्यांनी गायकवाडला 500 कोटी रुपये जामिनासाठी मागितल्याचा आरोप गायकवाडच्या वकिलांनी न्यायालयात दाखल याचिकेत केला आहे. तुम्ही मला पैसे द्या, मी तुम्हाला या प्रकरणातून बाहेर काढतो, असे सुपेकर यांनी सावकार यांनी म्हटल्याचा आरोप वकिलांनी केला आहे. त्यामुळे आता जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

गणेश आणि नानासाहेब गायकवाड कोण आहेत?

पुण्याच्या औंध परिसरात राहणारे नानासाहेब गायकवाड हे चिंचवडचे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे सख्खे मावस भाऊ आहेत. तर गणेश गायकवाड हा मोठा उद्योजक असून पाषाण आणि बाणेर परिसरात त्यांच्या अनेक मालमत्ता आहे. औंध आणि बाणेर परिसरात त्यांनी अनेक मॉल, आयटी कंपन्या, दुकाने यांना आपल्या जमिनी, दुकाने, कार्यालये भाडेतत्त्वावर दिली आहेत. यातून गणेश गायकवाड याला दरमहा कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे. त्याने त्यावेळी भाजपला रामराम करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, या कृत्यांमुळे त्याला पक्षातून काढून टाकण्यात आले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार असताना दिपक साळुंखे यांची मुलगी मुक्ता हीचा विवाह गणेश गायकवाड याच्यासोबत झाला. दिपक साळुंखे हे राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष देखील राहिलेले आहेत‌. त्यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून एकदा राष्ट्रवादी तर एकदा शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली आहे‌. गायकवाडांना पाचशे कोटी साळुंखे यांच्यासाठी मागण्यात आलाचा आरोप आहे. यामध्ये दिपक साळुंखे, मुक्ता साळुंखे, जालिंदर सुपेकर, अमरावती कारागृह प्रशासन आणि राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे. 

गणेश गायकवाडचे वडील नाना गायकवाड पुण्यात सावकारकीसाठी ओळखले जायचे. 2017 मध्ये लग्न झाल्यानंतर हुंड्यासाठी मुक्ताला मारहाण करण्यात येत असल्याची तक्रार तिने केली. 2018 ला तीने पहिली तक्रार दाखल केली. त्यानंतर देखील छळ चालूच राहिल्याने 2021 मध्ये तीने पुन्हा तक्रार दिली. या तक्रारीनंतर गायकवाड बाप लेकांना अटक झाली आणि पुढे मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget