Parinay Fuke: शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये अन् सुट्टीसाठी युरोपात जाणारे मराठीचं रक्षण काय करणार; भाजप नेत्याचा ठाकरे बंधूंना टोला
Parinay Fuke: उद्या त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची आभार सभा घ्यायला पाहिजे कारण देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी जीआर रद्द केला आहे, असंही पुढे आमदार परिणय फुके यांनी म्हटलं आहे.

मुंबई: त्रिभाषा धोरणाबाबतचा निर्णय रद्द केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांचा एकत्रितपणे 5 जुलै रोजी विजयी मेळावा साजरा करणार आहे. मुंबईतील वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा एकत्रित भव्य मेळावा होणार आहे. या मेळाव्यवरती भाजप नेत्यांनी हल्लाबोल केला आहे, दरम्यान भाजप आमदार परिणय फुके यांनी ठाकरे आणि मनसे यांच्या मेळाव्यावरती एक कविता सादर केली आहे. उद्या होणाऱ्या मोर्चाबाबत ही कविता आहे, उद्या त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची आभार सभा घ्यायला पाहिजे कारण देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी जीआर रद्द केला आहे, असंही पुढे आमदार परिणय फुके यांनी म्हटलं आहे.
परिणय फुके यांनी नेमकं काय म्हटलंय?
घरात आईला म्हणणार मम्मी
मोर्चामध्ये जाणार आम्ही
कॉन्व्हेंट मध्ये घेणार शिक्षण
मराठीचं करणार रक्षण
सुट्टीसाठी आहे युरोप
दुसऱ्यांवर करणार आरोप
सत्तेसाठी वेगळे झालो
आता सत्तेसाठी एकत्र आलो
लाथाडले जनतेने
आता काय करतील कोण जाणे
हिंदुत्वाचे कधी दुकान, कधी प्यारे टिपू सुलतान
कास मराठीची धरली, निवडणुकीत केम छो वरळी
धारावीत दाखवला रुबाब, लुंगी बहादूर छोटे नवाब
भारत भर भाराभर चिंध्या
एक ना धड अस्तित्वाची धडपड
बुडाखालून गेल्या खुर्च्या म्हणून मराठीचा मोर्चा
मोडीत काढला ठाकरे ब्रँड आता चहू बाजूने वाजला बँड
अशा शब्दात परिणय फुके यांनी राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्या उद्याच्या विजयी मेळाव्यावरती हल्लाबोल केला आहे. दरम्यान भाजप आमदार परिणय फुके यांनी ठाकरे आणि मनसे यांच्या मेळाव्यावरती एक कविता सादर केली आहे. उद्या होणाऱ्या मोर्चाबाबत ही कविता आहे, उद्या त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची आभार सभा घ्यायला पाहिजे कारण देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी जीआर रद्द केला आहे, असंही पुढे आमदार परिणय फुके यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा विजयी मेळावा
येत्या 5 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र विजयी मेळावा होणार आहे. मुंबईतील वरळी परिसरातील डोम सभागृहात सकाळी 10 वाजता हा ऐतिहासिक विजयी मेळावा होणार आहे. राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधूंकडून मोर्चाची हाक देण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच राज्य सरकारने हा शासन निर्णय रद्द केला. यानंतर ठाकर बंधूंकडून मोठा जल्लोष कण्यात आला. मराठी एकजुटीने मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर येत्या 5 जुलैला हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आता या मेळाव्यासाठी एक खास निमंत्रण पत्रिकाही बनवण्यात आली आहे. यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र नाव पाहायला मिळत आहे.
























