एक्स्प्लोर

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या शिवसेना पक्षातून जे आऊटगोइंग सुरू आहे, त्यावर उपाय काय? संजय राऊतांच्या प्रश्नावर ठाकरे म्हणाले 'साचलेल्या डबक्याला थोडासा...'

Uddhav Thackeray: आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही नगरसेवकांनी पक्षांतर देखील केलं, त्यावर ठाकरेंनी भाष्य केलं आहे.

नाशिक: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडल्या. नाराजीनाट्य, पक्षातून हकालपट्टी, पक्षांतर यासह अनेक मोठ्या घडामोडींनी  राजकारण ढवळून निघालं. अशातच त्याचबरोबर आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही नगरसेवकांनी पक्षांतर देखील केलं. या सर्व घडामोडींमध्ये मोठं खिंडार पडलं ते शिवसेना ठाकरे गटाला.  भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने नाशिकमधील ठाकरे गटाची अख्खी संघटना खिळखिळी केली त्यावरती सामनाला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना (उबाठा)चे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्पष्टपणे भाष्य केलं आहे.

चला एक ‘बला’ गेली! 

संजय राऊतांच्या, आपल्या पक्षातून जे आऊटगोइंग सुरू आहे, त्यावर उपाय काय? या प्रश्नावर उत्तर देताना उध्दव ठाकरे म्हणाले, 'काही वेळेला साचलेल्या डबक्याला थोडासा आऊटलेट द्यावा लागतो आणि नवीन झरा यावा लागतो. कधी कधी भावनेच्या भरात किंवा प्रेमापोटी एखादा माणूस अयोग्य असला तरी आपण बाजूला करत नाही, पण जेव्हा तो स्वतःहून जातो आणि त्याची जागा दुसरा घेतो तेव्हा बरं वाटतं की, चला एक ‘बला’ गेली! आता जे आमच्यातून गेले ते तिकडे जाऊन काय दिवे लावताहेत ते तुम्ही बघताच आहात. त्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे', असंही पुढे उध्दव ठाकरेंनी म्हटलं आहे.

ज्यांना शिवसेनेनं मोठं केलं, त्यातले काही गेले

शिवसेना हा एक विचार होता आणि आहे. शिवसेना हे लोहचुंबक आहे असे बाळासाहेब म्हणायचे. एक विचार म्हणून लोक त्याला चिकटून राहायचे. त्या चुंबकाचा असर कमी झालाय का? या प्रश्नावर उत्तर देताना उध्दव ठाकरे म्हणाले, सर्वसामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता जो कधी काही मागण्यासाठी माझ्याकडे किंवा शिवसेनाप्रमुखांकडे आलाच नव्हता. त्यांच्या पिढ्यान्पिढ्या आजही शिवसेनेसोबत आहेत. कुठलीही ओळख नसताना ज्यांना शिवसेनेनं मोठं केलं, त्यातले काही गेले, पण त्यांना मोठं करणारे अजूनही माझ्यासोबत आहेत. हीच माझी शक्ती आहे आणि तीच यांची खरी पोटदुखी आहे की, इतकं करूनही हे संपत कसे नाहीत? असंही ते पुढे म्हणालेत.

ठाकरे हा नुसता ब्रँड नाही तर...

हा जो ठाकरे ब्रँड आपण म्हणतोय, ‘ब्रँड’ हा शब्द इंट्रेस्टिंग आहे. जगात अनेक मोठमोठे ब्रँड व्यवसायात, उत्पादनात, व्यापारात येतात. मग ते ब्रँड एकमेकांना संपवण्यासाठी संघर्ष करतात. तरी हा ठाकरे ब्रँड 50 वर्षांपेक्षा जास्त काळ देशाच्या राजकारणात टिकून राहिला. यावर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, ठाकरे हा नुसता ब्रँड नाही. हा ब्रँड म्हणजे महाराष्ट्राची, मराठी माणसाची, हिंदू अस्मितेची ओळख आहे. ही ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न काहींनी केला. पुसू इच्छिणारे पुसले गेले. अनेक आले, अनेक गेले. जनतेने त्यांना पुसून टाकले.

असं काय आहे ठाकरे ब्रँडमध्ये? तुमची तिसरी पिढी हा ब्रँड घेऊन समाजकारणात, राजकारणात आहे. यावर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, ते आम्ही कसं सांगणार? ते जनतेने सांगायला पाहिजे. आज माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. तरीसुद्धा कुठेही गेलं तरी लोक प्रेमाने, आपुलकीने स्वागत करतात. बोलायला येतात. जे घडतंय त्याबद्दल संताप, हळहळ व्यक्त करतात. काही झालं तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत असं सांगतात.

हा ब्रँड संपवण्यासाठी दिल्लीपासून महाराष्ट्रात अनेक लोक कामाला लागलेत की, आता आम्ही हा ब्रँड संपवणारच, यावर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, होय, खरं आहे. ठाकरे ब्रॅण्ड संपवण्यासाठी अनेक बॅण्ड वाजताहेत. कारण त्यांना स्वतःशिवाय देशात कोणतंही अन्य नाव नको आहे. स्वतःची तुलना ते देवाबरोबर करायला लागलेत. बॅलेट पेपरवर मतदान घ्या, मग काय व्हायचं ते होऊ द्या!

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai BMC Tabs: मुंबई महापालिकेतील 237 नगरसेवकांना टॅब देण्याच्या भाजपच्या योजनेला ब्रेक; 'मेड इन चायना' टॅबलेटचा GeM खरेदी प्रक्रियेत अडथळा
मुंबई महापालिकेतील 237 नगरसेवकांना टॅब देण्याच्या भाजपच्या योजनेला ब्रेक; 'मेड इन चायना' टॅबलेटचा GeM खरेदी प्रक्रियेत अडथळा
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Bajrang Sonwane on Vilas Ghule Case: विलास घुले प्रकरणात मुलाचं नाव, बजरंग सोनवणेंचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले, 'ब्लॅकमेलिंग चालू आहे पण आता मी...'
विलास घुले प्रकरणात मुलाचं नाव, बजरंग सोनवणेंचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले, 'ब्लॅकमेलिंग चालू आहे पण आता मी...'

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget