एकाही कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका, प्रकाश आंबेडकरांंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले, "इथला कुणबी मराठा डबल.."
राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून आक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना दिसतायत.
Prakash Ambedkar: ओबीसी आरक्षणाला 100 टक्के धोका असल्याचं वक्तव्य केल्यानंतर वंचित बहुजनचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आता आणखीएकदा खळबळजनक वक्तव्य केलं आहे. कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका असं त्यांनी ओबीसींना आवाहन केलंय. विधानसभेत ठरावाच्यावेळी कुणबी समाजाची पाटीलकी जागी झाली तर ते आपल्या बाजूने मतदान करणार नाहीत. असं ते म्हणालेत.
सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. मराठा आरक्षणासाठी झगडणारे मनोज जरांगे पाटील हे आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवे आहे, अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे. त्यांना आमच्या प्रवर्गात सामावून घेऊ नये, अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे. असे असतानाच दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून आक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना दिसतायत. वाशिम येथील ओबीसी आरक्षण यात्रेनिमित्त ते बोलत होते.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वाशिमच्या पोहरादेवी येथे खळबळ जनक वक्तव्य केलंय. या निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका असं त्यांनी ओबीसींना आवाहन केलं असून विधानसभेत ठरावाच्या वेळी कुणबी समाजाची पाटीलकी जागी झाली तर ते आपल्या बाजूने मतदान करणार नाहीत. त्यामुळे यापुढे ओबीसींनी कुणबी सोडून इतर ओबीसी उमेदवाराला मतदान केलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
इथला कुणबी मराठा डबल भूमिका घेतो
विधानसभा ठरावाच्या वेळी कुणबी समाजाची पाटीलकी जागी झाली तर ते आपल्या बाजूने उभारणार नाहीत. कारण इथला कुणबी मराठा डबल भूमिका घेतो. आपल्यामध्ये बसला की स्वत:ला ओबीसी म्हणवतो आणि पाटलांमध्ये बसला की मराठा म्हणतो. त्यामुळे या निवडणुकीत खूणगाठ बांधा मी ओबीसीलाच मतदान करणार..असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले.
विधिमंडळात केवळ 11 ओबीसी आमदार
"कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा. विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून केवळ 11 ओबीसी आमदार आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे," असे खळबळजनक विधान वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते यवतमाळच्या पुसदमध्ये जाहीर सभेला संबोधित करत होते.
ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे
म्हणूनच मी सावध राहा असे सांगत आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे. हा धोका 100 टक्के आहे. निवडणुकीनंतर हा धोका निर्माण होईल. माझ्या आधीच्या वक्त्याने सांगितलं की ओबीसींची जातगणना झाली पाहिजे. ही जनगणना झाली पाहिजे," अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.