एक्स्प्लोर

Vijay Wadettiwar : शिवानी वडेट्टीवार यांना नाकारलं, प्रतिभा धानोरकरांना तिकीट, चंद्रपूरच्या जागेबाबत वडेट्टीवार स्पष्टच बोलले!

विजय वडेट्टीवार यांनी प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी आणि शिवाणी वडेट्टीवार यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आतापर्यंत 12 जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये चंद्रपूर (Chandrapur) मतदारसंघाचाही समावेश आहे. या जागेवर भाजपाने प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांना उमेदवारी दिलीय. या जागेवर मुलगी शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांना तिकीट मिळावे, यासाठी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्याकडून प्रयत्न चालू होते. त्यासाठी त्यांनी दिल्लीच्या नेत्यांशीही बातचित केली. मात्र शेवटी या जागेवर प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांना तिकीट देण्यात आहे. त्यानंतर आता याच प्रतिभा धानोरकर यांच्याविषयी वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते.

माझं नाव गडबडीत विसरल्या असाव्यात 

चंद्रपूरसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिभा धानोकर यांचे नागपुरात जोरदार स्वागत करण्यात आले. विमानतळावर उतरल्यानंतर प्रतिभा धानोकर यांनी काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. मात्र यावेळी त्यांनी विजय वडेट्टीवार यांचे नाव घेतले नाही. यावर धानोरकर वडेट्टीवार यांच्यावर नाराज आहेत, का असा प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले की, धानोरकर गडबडीत माझं नाव विसरल्या असाव्यात. नाव घेणं गरजेचे नाही. यामुळे फारसा फरक पडत नाही. नाव घेतलंच पाहिजे असं नाही, अशा भावना वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्या. 

शेवटी हायकमांडचा निर्णय अंतिम असतो 

धानोरकर यांच्या प्रचाराला जाणार की नाही, असा देखील प्रश्न वडेट्टीवार यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, प्रचारासाठी जिथं जाता येईल मी तिथं जाणार आहे. शक्य होईल तिथे सगळीकडे जाणार. पक्षाने जो निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो. उमेदवारी मागण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. हाच अधिकार शिवानी वडेट्टीवार यांनादेखील होता. हायकमांडचा निर्णय अंतिम असतो. त्यामुळे काहीही अडचण नाही. शेवटी पक्षाच्या उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठी मी जाणार आहे. शक्य होईल तिथे मी जाणार आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. 

तिकीट देताना भाजपला घाम फुटला 

तसेच त्यांनी पुढे बोलताना भाजपवरही टीका केली. भाजपने इच्छूक नसणाऱ्यांनाही तिकीट दिले आहे. उमेदवारांच्या गळ्यात जबरस्तीने वरमाला टाकण्यात आली आहे. तिकीट देताना भाजपला घाम फुटला आहे. यातून भाजपची महाराष्ट्र तसेच विदर्भातील दयनीय अवस्था दिसते, असं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा >>

भान राखून विचारांची लढाई विचाराने लढू, प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंना डिवचलं; खुल्या पत्राची चर्चा!

प्रणिती शिंदेंच्या खुल्या पत्राला राम सातपुतेंचे 'जय श्रीराम'ने उत्तर; सोलापुरातील राजकीय धुळवडीची चर्चा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावली
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावली
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतातTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM :  8 नोव्हेंबर 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal Full PC : ED च्या सुटकेपासून नव्हे, तर विकासासाठी भाजपसोबत - छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावली
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावली
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Sunil Shelke: सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
Numerology : अतिशय संथ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्यातल्या छोट्या कामाचा करतात प्रचंड कंटाळा, हुशार असूनही पडतात मागे
अतिशय संथ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्यातल्या छोट्या कामाचा करतात प्रचंड कंटाळा, हुशार असूनही पडतात मागे
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
Sanjay Raut : राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
Embed widget