एक्स्प्लोर

Video: सुनेत्रा पवार बारामतीत कशा हरल्या, निकालाच्या चार महिन्यानंतर विजय शिवतारेंनी सविस्तर सांगितलं!

Vijay shivtare: लोकसभा निवडणुकांवेळी बंडाच्या भूमिकेत असलेल्या विजय शिवतारेंनी आता विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.

Vijay shivtare: पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून आजही लोकसभा निवडणुकीतील विजय आणि पराजयाची चर्चा होतेय. कारण, विधानसभा निवडणुकांना लोकसभेची पार्श्वभूमी जोडली जात असून त्याच अनुषंगाने विधानसभा निवडणुकांची रणनीती आखण्यात येत आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात काँटे की टक्कर होणार असून विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये वरिष्ठ पातळीवर जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम होत असून गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यागाची शिकवण दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यावरुन, बोलताना शिवसेना शिंदे गटातील नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे (vijay shivtare) यांनी पुन्हा एकदा बारामती लोकसभा निवडणुकांच्या विषयाला हात घातला. तसेच, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांच्या पराभवाचं सविस्तर व पद्धतशीर विश्लेषणही त्यांनी केलंय.

लोकसभा निवडणुकांवेळी बंडाच्या भूमिकेत असलेल्या विजय शिवतारेंनी आता विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. मी आपल्याला सांगतो, महायुतीच्या नेत्यांनी, माझे नेते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणीस आणि अजित दादा पवार हे तिघे मिळून जेव्हा निर्णय घेतील, त्यावेळेस पुरंदरमधून विजय शिवतारे आणि विजय शिवतारेच लढणार. म्हणून त्या बाबतीमध्ये त्यांनी जे आदेश दिले ते मी पाळले असे म्हणत उमेदवारीच्या घोषणेची आपण वाट पाहात असल्याचे शिवतारे यांनी म्हटले. दरम्यान, यावेळी, बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव नेमका कसा झाला, याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली.

शेवटी जनता जनार्दन अंतिम आहे, मला एवढं माहिती होतं की माझी 1 लाख मतं आहेत. ही मतं कुठल्याही परिस्थितीत दादांना द्यायची, ती मतं कुठल्याही परिस्थितीत दादांना द्यायची हे मी ठरवलं, थोडसं कुठंतरी कमी पडलो. थोडीशी सेंटिमेंटल इनकॅशमेंट होती, घरातला प्रश्न असल्यामुळे तो पराभव झाला. माझ्या मतदारसंघातून लीड नाही मिळालं असं नाही. उदाहरण बघा, आमचे आढळराव पाटील लढले, त्या मतदारसंघात महायुतीचे सगळे आमदार आहेत. पण, लीड नाही मिळाला. एखाद्यावेळेस असं वारं फिरतं. गैरसमज व फेक नेरेटीव्ह पसरले गेले, संविधान बदलणार, आरक्षण घालवून टाकतील, मुस्लिमांमध्ये भीतीचं वातावरण पसरवलं गेलं, असे सविस्तर विश्लेषण विजय शिवतारे यांनी विधानसभा निवडणुकाचं केलंय.     

तो आजचा प्रश्न नाही

लोकसभेला तुम्ही ज्या पद्धतीने अजित पवारांच काम केलं, उमेदवार सुनेत्रा पवारांसाठी काम केलं, त्या पद्धतीने अजित पवार गट, अजित पवार हे तुमच्यासाठी काम करतील असं वाटतं का, असा प्रश्न शिवतारे यांना विचारण्यात आला होता. त्यावर, मला वाटतं आजचा हा प्रश्नच नाही, असेही उत्तर शिवतारे यांनी दिलं.  

कामाच्या जिवावर महायुतीचं सरकार येईल

एक गोष्ट आहे की, काही सेंटिमेंटल भाग आहे, कौटुंबिक भाग आहे त्या बाबतीमध्ये काय होईल त्याच आपण बोलू शकत नाही. पण, कामाच्या जीवावर महाराष्ट्राची केलेली दोन वर्षातली प्रगती. इन्फ्रास्ट्रक्चर, नवीन नवीन योजना, एफडीआयची इन्वेस्टमेंट, लाखो लाखो कोटी फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट राज्यामध्ये सगळ्यात जास्त त्यांनी आणल्या आणि म्हणून निश्चितपणे कामाच्या जीवावर ते पुढे आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं त्यांनी कौतुक केलंय. 

हेही वाचा

विधानसभेपूर्वीच बंडोबांना केले थंड, 27 जणांना महामंडळावर संधी; प्रशांत परिचाकांनाही अध्यक्षपद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

New Justice Statue : भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
आमदार सतिश चव्हाणांचे पत्र अत्यंत गंभीर; पक्षाकडून कारवाई होणार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
आमदार सतिश चव्हाणांचे पत्र अत्यंत गंभीर; पक्षाकडून कारवाई होणार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
मुंबईकरांनो 2 दिवस पाणी जपून वापरा; वैतरणा जलवाहिनीत बिघाड, पाणीपुरवठा कपात
मुंबईकरांनो 2 दिवस पाणी जपून वापरा; वैतरणा जलवाहिनीत बिघाड, पाणीपुरवठा कपात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8 PM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सHiraman Khoskar : निर्मला गावितांना उमेदवारी द्यायचीय म्हणून माझ्यावर क्रॉस व्होटिंगचे आरोप1 Minute 1 Constituency | 1 मिनिट 1 मतदारसंघ | विधानसभा निवडणूक | वेगवान बातम्या | 16 OCT 2024Bhai Jagtap On Seat Sharing मविआचं मुंबईतील जागावाटप 90% पूर्ण, तीन जागांचा तिढा उद्यापर्यंत सूटणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
New Justice Statue : भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
आमदार सतिश चव्हाणांचे पत्र अत्यंत गंभीर; पक्षाकडून कारवाई होणार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
आमदार सतिश चव्हाणांचे पत्र अत्यंत गंभीर; पक्षाकडून कारवाई होणार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
मुंबईकरांनो 2 दिवस पाणी जपून वापरा; वैतरणा जलवाहिनीत बिघाड, पाणीपुरवठा कपात
मुंबईकरांनो 2 दिवस पाणी जपून वापरा; वैतरणा जलवाहिनीत बिघाड, पाणीपुरवठा कपात
Sharad Pawar NCP : इस्लामपुरात शरद पवारांच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता सभेत तुफान पाऊस; भर पावसात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
इस्लामपुरात शरद पवारांच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता सभेत तुफान पाऊस; भर पावसात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
Maharashtra Vidhan Sabha Election : महायुतीच्या जागावाटपावर भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक; फडणवीस, बावनकुळे दिल्लीत पोहोचले
महायुतीच्या जागावाटपावर भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक; उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दिल्लीत पोहोचले
टोविंग वाहन कर्मचाऱ्यांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद; वाहनधारकांच्या अंगावर धावून, अरेरावी
टोविंग वाहन कर्मचाऱ्यांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद; वाहनधारकांच्या अंगावर धावून, अरेरावी
Maharashtra Vidhan Sabha Election : जागावाटपासाठी काँग्रेसची दिल्लीत बैठक, कोण होणार मुंबईत मोठा भाऊ अन् किती जागांवर तोडगा निघाला?
जागावाटपासाठी काँग्रेसची दिल्लीत बैठक, कोण होणार मुंबईत मोठा भाऊ अन् किती जागांवर तोडगा निघाला?
Embed widget