एक्स्प्लोर

Vaibhav Khedekar: वैभव खेडेकरांचा भाजप पक्षप्रवेश अजूनही अनिश्चित; स्टेटस ठेवत म्हणाले, माझ्याच वाट्याला...

Vaibhav Khedekar: भाजप पक्षप्रवेशाच्या प्रश्नावर वैभव खेडेकरांचे मौन कायम आहे. तसेच माध्यमांसोबत बोलण्यास वैभव खेडेकरांचा स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.

Vaibhav Khedekar: मनसेतून बडतर्फ करण्यात आलेले वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांना भाजपकडून (BJP) पुन्हा वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे, कोकणातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांना काही दिवसांपूर्वी पक्षातून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर वैभव खेडेकरांचा भाजपमधील पक्षप्रवेश निश्चित करण्यात आला होता. यासाठी वैभव खेडेकर शेकडो गाड्या घेऊन मुंबईत देखील दाखल झाले होते. मात्र पक्षप्रवेश न करता वैभव खेडेकरांना माघारी परतावे लागले. त्यानंतर 8 ते 10 दिवस उलटूनही वैभव खेडेकरांचा भाजप पक्षप्रवेश अजूनही अनिश्चित असल्याचं बोललं जात आहे. 

भाजप पक्षप्रवेशाच्या प्रश्नावर वैभव खेडेकरांचे मौन कायम आहे. तसेच माध्यमांसोबत बोलण्यास वैभव खेडेकरांचा स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून वैभव खेडेकर यांचे संभ्रमात टाकणारे व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत आहे. जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मजा नाही, असं वैभव खेडेकरांनी म्हटलं आहे. 

वैभव खेडेकरांनी स्टेटसमध्ये नेमकं काय म्हटलंय? (Vaibhav Khedekar Status)

सर्वांशी चांगलं वागूनही देव माझ्याच वाट्याला अडचणी का टाकतो? यामागे देखील एक कारण आहे. देव त्याच्याच वाटेला अडचणी टाकतो, ज्याच्यामध्ये अडचणी पेलण्याची ताकद आहे आणि जो अडचणींवर मात करून पुढे जातो त्याला देव नक्की मोठा करतो. वैभव खेडेकरांच्या व्हाट्सअप स्टेटसचा रोख नेमका कोणावर?, याबाबत जोरदार चर्चा आहे. 

वैभव खेडेकरांच्या भाजप प्रवेशावर उदय सामंत काय म्हणाले? (Uday Samant On Vaibhav Khedekar)

वैभव खेडेकर माझे जवळचे मित्र आहेत. मात्र त्यांचा पक्षप्रवेश का रद्द झाला माहिती नाही. पक्षप्रवेश तीन वेळा रद्द होणं हे खच्चीकरण आहे. ते भाजपात चालले ना, ते शिवसेनेत येतात का बघा...तीनवेळा त्यांचा पक्षप्रवेश आमच्याकडे रद्द होणार नाही, याची खात्री देतो, असं उदय सामंत म्हणाले. 

वैभव खेडेकर कोण? (Who Is Vaibhav Khedekar)

वैभव खेडेकर हे राज ठाकरे यांचे कोकणातील महत्त्वाचे आणि गेल्या 20 वर्षांपासूनचे शिलेदार मानले जात होते. त्यांनी 2014 मध्ये वैभव खेडेकर यांनी दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. राज ठाकरेंनी मनसे स्थापन केल्यापासून ते त्यांच्याबरोबर होते. इतकंच नाही तर खेड नगरपरिषद निवडून आणण्यात वैभव खेडेकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. ते यापूर्वी खेडचे नगराध्यक्ष होते. यापूर्वी त्यांचा थेट सामना शिवसेना नेते रामदास कदम यांच्यासोबत राहिला होता, पण अलिकडे हा संघर्ष कमी झाला. युवा वर्गामध्येही वैभव खेडेकर यांची क्रेझ आहे. वैभव खेडेकर यांच्यावर आता सद्यस्थितीत मनसेच्या राज्य सरचिटणीस, कोकण संघटकपदाची मोठी जबाबदारी होती. 

संबंधित बातमी:

Vaibhav Khedekar : राजसाहेब आपण फार घाई केली, तुम्ही कालही मनात होता आणि उद्याही राहाल; मनसेतून हकालपट्टी होताच वैभव खेडेकर भावूक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget