Congress manifesto: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 साठी (UP Election 2022) काँग्रेसन जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. काँग्रेसच्या महासचिन प्रियंका गांधी यांनी आज (9 फेब्रुवारी) हा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. 'उन्नती विधान जन घोषणा पत्र-2022' (Unnati Vidhan Jan Ghoshna Patra-2022) असं या जाहीरनाम्याला नाव देण्यात आलंय. काँग्रेसनं प्रसिद्ध केलेल्या आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचं दहा दिवसाच्या आत कर्ज माफ करण्याचं, 20 लाख लोकांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलंय. याशिवाय, अनेक महत्वाच्या गोष्टींचा जाहीरनाम्यात उल्लेख करण्यात आलाय.


उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसचा हा तिसरा जाहीरनामा आहे. काँग्रेसनं यापूर्वी तरूणांसाठी 'भर्ती विधान घोषणा पत्र' आणि महिलांसाठी 'शक्ति विधान घोषणा' पत्राची घोषणा केली होती. प्रियंका गांधीनं म्हटलं आहे की, "यूपीच्या लोकांकडून सर्व सूचना घेण्यात आल्या आहेत. सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. वीज बिल माफ केले जाईल, कोविड बाधित कुटुंबांना 25,000 रुपये दिले जातील. 20 लाख सरकारी नोकऱ्या देऊ. कोणत्याही आजारासाठी 10 लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल. शेण 2 रुपये किलोने विकत घेतले जाईल. ज्याचा वापर पुढे वर्मी कंपोस्ट तयार करण्यासाठी केला जाईल. लघू आणि मध्यम उद्योगांना अधिक फटका बसलाय. या उद्योगांना सरकारकडून कोणतंही सहकार्य मिळालं नाही. आम्ही क्लस्टर्सचा विकास आणि समर्थन करू, असंही त्यांनी म्हटलंय. 


ट्वीट-



काँग्रेसचा जाहीरनामा-


- सरकार स्थापन झाल्यानंतर केवळ दहा दिवसांच्या आत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे. 
- थकीत वीज बिल माफ केलं जाईल.
- कोरोना प्रभावित कुटुंबियांना 25 हजार देणार. 
- कोणत्याही आजारासाठी 10 लाख रुपयांची मदत केली जाईल.
- गायचं शेण खरेदी केलं जाणार. 
- शेतकऱ्यांकडून 2500 रुपयात गहू आणि 400 रुपयांनी ऊस खेरदी केला जाणार. 
- 20 लाख सरकारी नोकरी.
- आरक्षणांतर्गत 40 टक्के महिलांना रोजगार दिला जाईल. 
- भटक्या जनावरांमुळे झालेल्या नुकसानीबाबत 3 हजारांची भरपाई मिळणार.
- ग्रामप्रमुखाच्या पगारात महिन्याला ६ हजार रुपयांनी वाढ करणार.
- कोरोनामुळं मृत्यू झालेल्या कोविड योद्धाला 50 लाख दिले जाणार. 
- शिक्षकांच्या 2 लाख रिक्त पदांवर भरती केली जाणार.
- कारागीरांसाठी विधान परिषदमध्ये एक आरक्षित सीट ठेवली जाणार.
- पत्रकारांविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेणार. 
- दिव्यांग लोकांना 3 हजारांची मासिक पेन्शन सुरु केली जाणार.
- महिला पोलीस कर्माचाऱ्यांच्या गृह जनपथमध्ये पोस्टिंग करण्याची परवानगी दिली जाईल.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha